रहस्यमय सामग्री पाहून तज्ञही चकित
दक्षिण चीन समुद्रात मिळालेल्या दोन जहाजांमधून प्राप्त लाकूड आणि मिंग युगातील मातीच्या भांड्याचे अवशेष हे 500 वर्षे जुने असल्याचे कार्बन डेटिंगमधून स्पष्ट झाले आहे. चिनी पुरातत्वतज्ञांनी या सामग्रीद्वारे जुन्या रेशीम मार्गाबद्दल माहिती मिळविता येणार असल्याचे म्हटले आहे. जहाजांचे अवशेष दक्षिण चीन समुद्राच्या उत्तर-पश्चिम किनाऱ्यानजीक समुद्रतळात सापडले आहेत. चायनीज अकॅडमी ऑफ सोशल सायन्सेसमध्ये पुरातत्व संस्थेच्या माध्यमातून स्टेट अॅडमिनिस्ट्रेशन ऑफ कल्चरल हेरिटेजने याची माहिती दिली आहे.
चिनी पुरातत्वतज्ञांना दक्षिण चीन समुद्रात ही 500 वर्षे जुनी जहाजं आढळून आली होती. या जहाजांमध्ये लाकूड अन् चिनी मातीच्या भांड्याचे अवशेष सापडले आहेत. मिंग साम्राज्याच्या काळात रेशीम मार्गाद्वारे आयात-निर्यात करण्यात आलेल्या या सामग्री असाव्यात असे सांगण्यात येत आहे.
जहाजात मिळालेले अवशेष मिंग राजवंशाच्या होंगजी काळातील आहे, हा काळ 1488-1505 पर्यंत चालला होता. या स्थळी तज्ञांना लाकडांचा ढिग अन् काही मातीची भांडी सापडली आहेत. सर्व लाकडी दांडे एकाच आकाराचे आहेत. सांस्कृतिक आणि पुरातत्व अधिकाऱ्यांनी आता खोल समुद्रात शोध अन् उत्खनन सुरू पेले असुन याकरता किमान एक वर्षाचा कालावधी लागणार आहे. समुद्राखाली हे अवशेष एखाद्या सांस्कृतिक वारशाप्रमाणे संरक्षित होते असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.