मोदी सरकारकडून कारवाई : संसदेत दिली माहिती
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अपेक्षित कामगिरी न करणाऱया एकूण 340 अधिकाऱयांना मागील 6 वर्षांमध्ये मुदतीपूर्वीच सेवानिवृत्त करण्यात आल्याचे केंद्र सरकारने गुरुवारी संसदेत सांगितले आहे. कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरादाखल राज्यसभेत ही माहिती दिली आहे.
विविध मंत्रालये आणि विभागांकडून प्राप्त माहितीनुसार एफआर 56 (जे) आणि अशाप्रकारच्या अन्य नियमांच्या अंतर्गत जुलै 2014 पासून डिसेंबर 2020 दरम्यान ‘ग्रूप अ’च्या 171 अधिकारी आणि ‘ग्रूप बी’च्या 169 अधिकाऱयांच्या विरोधात कारवाई करण्यात येणार आल्याचे सिंग यांनी सांगितले आहे.
कुठलाही शासकीय कर्मचारी कथित स्वरुपात भ्रष्ट असणे किंवा अपेक्षित कामगिरी करत नसल्यास मुदतीपूर्वीच सेवानिवृत्त करण्याची तरतूद संबंधित नियमांमध्ये आहे. 1 मार्च 2018 च्या स्थितीनुसार सरकारच्या अधीन नियमित नागरी कर्मचाऱयांची संख्या 38,02,779 असून पदस्थ कर्मचाऱयांची संख्या 31,18,956 इतकी असल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली आहे.