ॲड पुष्पराज शेट्ये यांचा युक्तीवाद : पैशावर दावा सांगण्यास आरोपींचा नकार : 9 वर्षापासून चालतोय खटला : जाकादेवी बँक दरोडा
रत्नागिरी / प्रतिनिधी
जाकादेवी सेंट्रल बँके दरोड्यात लुटून नेण्यात आलेले 6 लाख रूपये आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी जप्त केले. त्यासंबंधी पोलिसांकडून पंचनामा देखील करण्यात आला आहे. आरोपींकडून जप्त करण्यात आलेले 6 लाख रूपये त्यांच्याकडे कुठून आले याबाबत आरोपींनी उत्तर दिलेले नाही. तसेच या पैशावर आरोपींपैकी कुणीही दावा सांगितलेला नाही. यामुळे हे पैसे दरोड्यातीलच असल्याचे स्पष्ट होत आहे. असा युक्तीवाद सरकारी वकील ॲड. पुष्पराज शेट्ये यांनी न्यायालयापुढे केला.
जाकादेवी बँक दरोडा खटला आता अंतिम टप्प्यात आला आहे. सत्र न्यायाधीश विनायक राजाराम जोशी यांच्या न्यायालयापुढे हा खटला चालवण्यात येत आहे सरकारी पक्षाकडून ॲड. पुष्पराज शेट्ये हे युक्तीवाद करत आहेत. जाकादेवी सेंट्रल बँक येथे 28 नोव्हेंबर 2013 रोजी दरोडा टाकण्यात आला होता. यावेळी दरोडेखोरांनी बँकेतील एका कर्मचारी संतोष चव्हाण याला गोळी घालून ठार केले होते. तर सुरेश गुरव हा गंभीर जखमी केले होते. यावेळी बँकमधील 6 लाख रूपये दरोडेखोरांनी लुटून नेले होते. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांच्या तपासामध्ये 6 जणांना दरोडा प्रकरणी अटक करण्यात आलली होती.यामध्ये राजेंद्र राजावत (25, रा.कल्याण), हरिष गोस्वामी ( 25, रा.कल्याण), प्रथमेश सावंत (18, रा. जाकादेवी), शिवाजी भिसे ( 25, रा.कल्याण), निखिल सावंत (24, रा. डोंबिवली) आणि प्रशांत शेलार ( 28, रा. मुंबई). यांचा समावेश आह .त्यांच्याविरूद्ध पोलिसांनी संशयितांविरूद्ध भादंवि कलम 396,397,120 बी, आर्म्स ऍक्ट 3(25) नुसार गुन्हा दाखल केला. तसेच न्यायालयापुढे दोषारोपपत्र ठेवले.खटल्यातील युक्तीवाद दरम्यान सरकारी वकील शेट्ये यांनी जप्त करण्यात आलेल्या पैशाबाबत सरकारी पक्षाची बाजू न्यायालयापुढे मांडली. तसेच प्रत्यक्षदर्शी असलेल्या रमेश पाटील यांचा जबाब न्यायालयापुढे कथन केला. घटनेला ८ वर्ष उलटूनही बँकेतील शिपाई संतोष चव्हाण याच्या मारेकरी राजेंद्र राजावत यांला पाटील यांनी बोट दाखवून ओळखले आहे. रमेश पाटील यांनी आपल्या जबाबात सांगितले की, 28 नोव्हेंबर 2013 रोजी ते पैसे भरण्यासाठी बँकेत गेले होते. दुपारी १.३०च्या सुमारास पैसे भरण्याची स्लिप भरत असताना संशयित आरोपींपैकी हिरवा शर्टवाला इसम त्यांच्या जवळ आला व पुन्हा दरवाजा जवळ गेला.
यानंतर आणखी 4 संशयित दरवाजातून आत आले.त्यापैकी काळपट शर्ट घातलेल्या इसमाच्या हातामध्ये पिस्तुल होते. हात वर करून आपल्याला व शाळेतील मुलांना बाजूला उभे राहण्यास सांगितले. यावेळी काळपट शर्टमधील राजेंद्र राजावत हा बँक मॅनेजरच्या केबीनमध्ये गेला व ‘किज किज’ असे ओरडू लागल़ा यावेळी राजावत याने गुरव याच्या पोटामध्ये गोळी मारली. तसेच टेबलाखाली बसलेल्या संतोष चव्हाण याच्या पाठीच्या कण्यात गोळी मारली. या गोळीबारानंतर ‘तिजोरीकी चाबी दो, दस तक गिनती करूगा, नही दिया तो सबको गोली मार दुंगा’ असे राजावत याने धमकविण्यास सुरूवात केल़ी. यावेळी बँक मॅनेजर महिलेने चावी देत ‘तुमको जो लेना हे वो सब लेलो’ लेकिन किसीको कुछ मत करना’ असे सांगितल़े यावेळी संशयित आरोपींनी बँकेत आलेल्या एका इसमाला मारहाण करण्यास सुरूवात केल़ी तसेच त्याचा मोबाईल जमिनीवर आपटून फोडून टाकल़ा यानंतर 1 महिन्यांनी जिल्हा विशेष कारागृह याठिकाणी ओळख परेड घेण्यात आली होत़ी 14 जणांचे 3 ग्रुप करण्यात आले होत़े त्यामधील मुख्य आरोपी याला आपण ओळखल़े असे कथन पाटील यांनी न्यायालयापुढे केले आहे असे शेट्ये यांनी आपल्या युक्तीवादात सांगितले.