ऑनलाईन टीम / मुंबई :
ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने 6 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांसाठी भारत बायोटेकच्या ‘कोवॅक्सिन’ लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे.
भारत सरकारचे 100 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट असून, आतापर्यंत 12 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींसाठी लसीकरण सुरू होते. आता 12 वर्षाखालील मुलांचेही लसीकरण होणार आहे. DCGI ने 6 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोवॅक्सिन लसीला आत्पकालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. भारत बायोटेकला पहिल्या दोन महिन्यांसाठी दर 15 दिवसांनी आणि त्यानंतर पाच महिन्यांसाठी दर 15 दिवसांनी लसीकरणाच्या योग्य विश्लेषणासह प्रतिकूल घटनांसह सुरक्षा डेटा सबमिट करण्यास सांगितले आहे.