नवी दिल्ली :
बेंगळुरू स्थित व्हेंचर कॅपिटल फंड ग्रँड कॅपिटलने विद्यार्थी स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी 60 लाख डॉलरचा (सुमारे 49 कोटी) चा दुसरा फंड लॉन्च केला आहे. कंपनीने जारी केलेल्या निवेदनानुसार, विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या कंपन्यांमध्ये 40,000 डॉलर (रु. 33 लाख) चार टक्के इक्विटीवर गुंतवले जाणार असल्याची माहिती आहे.
ग्रँड कॅपिटलचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अभिषेक सेठी म्हणाले, ‘आम्ही व्यवहार शोधण्याच्या आणि त्यात गुंतवणूक करण्याच्या व्यवसायात नाही. आव्हानात्मक शिक्षण प्रणाली असूनही आम्ही विद्यार्थ्यांना अधिक महत्त्वाकांक्षी बनण्यासाठी आणि भविष्य घडवण्यासाठी सक्षम करण्याच्या व्यवसायात आहोत. क्वांटम
कॉम्प्युटरपेक्षा विद्यार्थी डि 2 डि कंपन्या सुरू करण्याची अधिक शक्यता आहे आणि आम्हाला त्यापेक्षा जास्त गरज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.’
निवेदनानुसार, निवडलेले उद्योजक बेंगळुरूमध्ये चार आठवड्यांच्या समूह कार्यक्रमात सहभागी होतील. चार आठवड्यांच्या कार्यक्रमात एथर एनर्जीचे सह-संस्थापक तरुण मेहता, रेझर्रेपेचे सह-संस्थापक शशांक कुमार आणि झोरोदाचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी कैलाश नाध यांच्यासोबतच्या सत्रांचा समावेश होणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.