निपाणीतील अक्सा मशीदनजीक घटना : एक संशयित ताब्यात
निपाणी : भीमनगर अक्सा मस्जीदनजीक मेहंदी कालेकाजी यांचा बंद बंगला फोडून तीन चोरट्यांनी एक तोळे सोने व रोकड 15000 ऊपये असा एकूण 65000 ऊपयाचा ऐवज सोमवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास लंपास केला. दरम्यान, गस्त घालणाऱ्या युवकांना सदर प्रकाराची माहिती समजताच त्यांनी चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र त्यातील दोन चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले तर एका संशयितास युवकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. सईम बागवान (रा. आझाद गल्ली, निपाणी) असे पकडलेल्या संशयित चोरट्याचे नाव आहे.
य् ााबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, काही दिवसांपूर्वी मेहंदी कालेकाजी हे सौदी अरेबिया गुमराह येथे गेले आहेत. तर सदर कुटुंबातील उर्वरित मंडळीही बाहेरगावी गेली आहेत. त्यामुळे बंगला बंद होता. हीच संधी साधून चोरट्यांने सोमवारी मध्यरात्री 2 च्या सुमारास बंगल्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तिजोरीतील साहित्य विस्कटून त्यातील सोन्याची एक तोळ्याची चेन व रोकड 15000 असा एकूण 65000 ऊपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. त्यावेळी त्याच गल्लीतील युवक गस्त घालत होते. कालेकाजी यांच्या बंगल्यात युवकांना कोणीतरी मोबाईलच्या बॅटऱ्या पाडत असल्याचे दिसले. ते बंगल्याजवळ जाताच चोरट्यांनी तेथून पोबारा करण्याचा प्रयत्न केला. मात्र युवक व चोरट्यांमध्ये झटापट झाली. त्यात अन्य दोघेजण पळून गेले. तर सईम बागवान याला पकडण्यात नागरिकांना यश आले. युवकांनी तत्काळ सईम याला पोलिसांच्या हवाली केले. तसेच नागरिकांनी बंगल्यानजीक चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी क्रमांक एमएच 05 इपी 6045 फोडली. घटनास्थळी निपाणी शहर पोलिसांनी भेट दिली. अधिक तपास निपाणी शहर उपनिरीक्षक विनोद पुजारी करत आहेत.