हिंडण्या-फिरण्यासाठी, खाण्या-पिण्यासाठी लोक मोठा खर्च करत असल्याचे आपण पाहिले असेल. परंतु एक महिला शॉपिंगवर एका दिवसात 70 लाख रुपये खर्च करते. सौदी नावाची ही महिला स्वत:च्या पतीच्या पैशांना केवळ छंद म्हणून खर्च करणे पसंत करते. सौदी स्वत:च्या पतीसोबत दुबईत राहते. सर्वसाधारपणे जमालच्या (तिचा पती) मूडवर अवलंबून असते, खरेदी करताना मी 3600 ते 72 हजार दिनारपर्यंत खर्च करू शकते असे सौदीने म्हटले आहे.
माझे पसंतीचे डिझायनर डायर असल्याचे ती सांगते. सौदी अनेकदा स्वत:च्या लक्झरी हॉलिडेंमध्ये महागडे रिसॉर्ट्स अन् बेटांवरील छायाचित्रे अन् व्हिडिओ पौस्ट करते. मी दुबईतील एक धनाढ्या गृहिणी असल्याचे सौदीने म्हटले आहे. टिकटॉक-इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. सौदी अन् तिच्या पतीला मॅचिंग कार अत्यंत पसंत आहेत. जमालने सौदीला एक बिर्किन बॅग आणि दोन कार्स गिफ्ट केल्या आहेत. मला केवळ डिझायनर कपडे अन् बॅग्स पसंत आहेत, मी सहजपणे दरदिनी प्रवासाकरता 14-15 लाख रुपये खर्च करत असल्याचे सौदीने सांगितले आहे.
अलिकडेच सौदीने मालदीव ट्रीपदरम्यान 12 लाखाहून अधिकचे शॉपिंग एकाचवेळी केले होते.अलिकडेच हे दांपत्य लंडन, जपान अन् सेशेल्समधून परतले आहे. तिला मॅनीक्योर अत्यंत पसंत असून याकरता प्रत्येकवेळी सुमारे 63 हजार रुपये इतका खर्च येतो. तसेच तिला सरप्राइज पसंत असल्याने जमाल महागडे रेस्टॉरंट बुक करत असतो. सौदीचा जन्म ससेक्स येथे झाला असून तिचा पती जमाल हा सौदी अरेबियातील धनाढ्या आहे.