मागविण्यात आल्या निविदा : इच्छुकांनी ऑनलाईन अर्ज करावा
प्रतिनिधी /बेळगाव
इलेक्ट्रिक वाहनांची संख्या झपाटय़ाने वाढत असल्याने राज्य सरकारच्या विद्युत विभागाने इलेक्ट्रॉनिक चार्जिंग स्टेशन्स सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बेंगळूर इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनी लि.ने चार्जिंग स्टेशन्ससाठी निविदा मागविल्या आहेत. बेळगाव जिल्हय़ात हेस्कॉम अंतर्गत पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप (पीपीपी) मॉडेल अंतर्गत 75 चार्जिंग स्टेशन्स उभारले जाणार आहेत.
इच्छुकांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. निविदेसंदर्भातील सर्व माहिती बेस्कॉमने वेबसाईटवर दिली आहे. 6 सप्टेंबरपर्यंत इच्छुकांना अर्ज करता येणार आहे. आलेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर संबंधित व्यक्तीला चार्जिंग स्टेशनसाठी परवानगी दिली जाणार आहे. शहरात सध्या इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढली असली तरी त्या प्रमाणात चार्जिंग स्टेशन्स उपलब्ध होत नसल्याने अनेक समस्या येत होत्या. यापुढील काळात चार्जिंग स्टेशन्स उपलब्ध झाल्यास नागरिकांची सोय होणार आहे.
येथे उभारली जाणार चार्जिंग स्टेशन्स
बेळगाव-पिरनवाडी केपीटीसीएल क्वॉर्टर्स, बेळगाव-पणजी रोड, खानापूर येथील हेस्कॉम स्टेशन, बीडी येथील हेस्कॉम स्टेशन, ऑटोनगर कणबर्गी रोड, श्रीनगर, डॉ. बी. आर. आंबेडकर रोड, केपीटीसीएल समुदाय भवन, पोलीस हेडक्वॉर्टर्स शिवाजीनगर, एपीएमसी रोड, अंजनेयनगर, गांधीनगर, आयटीआय कॉलेज मजगाव, द्वारकानगर मंडोळी रोड, देसूर, सांबरा, एअरमन टेनिंग स्कूल सांबरा, भुतरामट्टी, जेएनएमसी कॉलेज, कॉलेज रोड, आरटीओ ग्राऊंड ऑटोनगर, काकती, अशोकनगर, आझमनगर, हनुमाननगर, मध्यवर्ती बसस्थानक यासह जिल्हय़ातील 75 ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स उभारले जाणार आहेत.