राज्य बालहक्क रक्षण आयोगातर्फे जनजागृती : बळी पडलेल्या मुलींचे समुपदेशन तसेच हेल्पलाईन
पणजी : गोवा राज्यात गेल्या 5 वर्षात 76 अल्पवयीन मुली गर्भवती झाल्याची गंभीर व चिंताजनक बाब समोर आली असून सरासरी प्रतीवर्षी 16 ते 17 प्रकरणे घडल्याचे दाखवून देत आहे. पालक तसेच अल्पवयीन मुलींना विचार करायला लावणारी ही आकडेवारी असून अलिकडच्या काळात ही प्रकरणे वाढत असल्याचे दिसून येत आहे. प्रेमप्रकरणे, अपहरण, लैंगिक अत्याचार या कारणांमुळे अल्पवयीन मुली गर्भवती होत असल्याचे दिसत असून लैंगिक अज्ञान याचाही हा परिणाम असल्याचे स्पष्ट होत आहे. या गर्भवती प्रकरणात गोव्याबाहेरील मुली जास्त असल्या तरी गोव्यातील काही मुली त्यात बळी पडल्याचे समोर आले आहे. मुलींच्या पालकांसाठी ही एक मोठी समस्या आणि डोकेदुखी बनली असून पालकांचे दुर्लक्ष अशा प्रकारांना निमंत्रण देणारे ठऊ शकते म्हणून मुलींकडे सातत्याने लक्ष ठेवणे पालकांना आवश्यक बनले आहे. अशा प्रकरणात ती फसू नये आणि पुढे तिची फरपट होऊ नये म्हणून आता पालकांना दक्ष राहणे व मुलींमध्ये जागृती करणे काळाची गरज बनली आहे.
अल्पवयीन मुली गर्भवती राहणे धोकादायक असून त्यातून पुढे काय होईल हे कोणालाच सांगता येणार नाही. महिला आणि बालविकास खात्याच्या सूत्रांनी ही माहिती दिली असून त्याची मूळ कारणे शोधून काढण्यासाठी चौकशी चालू केल्याची माहिती मिळाली आहे. यात बळी पडलेल्या मुलींना साहाय्य करण्यासाठी सरकारने एक विभाग स्थापन केला असून तेथे त्यांचे समुपदेशन करण्यात येते. त्यांना मानसिक आधार दिला जातो. मुलींसाठी मदतवाहिनी (हेल्पलाईन) सुऊ करण्यात आली असून गोवा राज्य बालहक्क रक्षण आयोग या कामासाठी महत्त्वाची कामगिरी करीत आहे. बाल कल्याण समित्यांची स्थापनाही करण्यात आली असून तेथेही या प्रकरणी चर्चा कऊन जागृतीचे काम करण्यात येते. आरोग्य खात्यातर्फेही अल्पवयीन मुलींची गर्भधारण रोखण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले असून त्यांचे रक्षण करण्यावर भर देण्यात येत आहे. अल्पवयात गर्भवती होणे ही एक सामाजिक समस्या बनू लागली असून तिला वेळी आवर घालण्याची गरज निर्माण झाली आहे.