तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापुरात कोरोनाबाधित आणखी 11 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. शहरातील कोरोनाच्या रुग्णाची एकुण संख्या 61 झाली आहे. त्यापैकी ग्रामीण भागातील मोहोळ तालुक्यात कोरूना पॉझिटिवचा दुसरा रुग्ण आढळला आहे. 11 पैकी 5 सारीचे असून उर्वरित 6 पॉझिटिव व्यक्तीच्या संपर्कातील आहेत. आज एका महिलेचा सारी रोगाने मृत्यू झाला. त्यानंतर तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. एकूण 5 रुग्ण मृत झाले आहे. उर्वरित 56 जणांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी रविवारी दिली.
यापैकी शास्त्रीनगर 2, तेलंगी पाच्छा पेठ 1, कुर्बान हुसेन नगर 1, नई जिंदगी1, कर्णिक नगर 1, यशवंत नगर सोसायटी 1, तालुका पोलीस स्टेशन 1, एस आर पी कॅम्प 1, आयकर सोसायटी 1 आणि मोहोळ तालुक्यातील एक रुग्णाचा समावेश आहे व्यक्तीच्या समावेश आहे. तो भाग कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. शनिवारपर्यंत कोरोनाग्रस्ताची संख्या 50 होती त्यामध्ये 11 ने वाढ झाली असून संख्या 61 झाली आहे. 5 मृत झाले आहेत.
सोलापुरातील आयसोलेशन वार्डात 1228 व्यक्ती होते त्यापैकी 1052 जणांचे अहवाल प्राप्त झाला असून, यापैकी 991 जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.तर 61 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले आहेत. सोलापुरात नव्याने 11 कोरोनाबाधित रूग्ण आढळल्यामुळे व कोरोनाचे रुग्ण 61 झाल्यामुळे सोलापुरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.
सोलापुरातील कोरोना सद्यस्थिती
होम क्वारटाईनमध्ये: 1 हजार 970
आयसोलेशन वार्डात – 1228
-एकूण अहवाल प्राप्त : 1052
-आतापर्यंत अहवाल निगेटीव्ह : 991
-आतापर्यंतअहवाल पॉझीटीव्ह : 61
-प्रलंबित रिपोर्ट- 176
-मृत : 05