रोज स्वयंपाक करण्यापासून महिलेने मिळविली मुक्ती
सर्वसाधारणपणे लोक ताजे भोजन घेणे पसंत करतात. लंच, डिनर आणि न्याहरी मूडच्या हिशेबानुसार बदलत देखील असते. परंतु एका महिलेने कमालच केली आहे. तिने केवळ स्वतःसाठी नव्हे तर पूर्ण कुटुंबासाठी पुढील 8 महिन्यांचा स्वयंपाक एकाचवेळी तयार केला आहे. याद्वारे तिने दररोज स्वयंपाक करण्यापासून मुक्ती मिळविली आहे.
या 30 वर्षीय महिलेचे नाव केल्सी शॉ असून ती अमेरिकेच्या इंडियाना येथे राहते. केल्सीने पुढील 8 महिन्यांसाठी ब्रेकफास्ट, लंच अन् डिनर तयार करत तो साठवून ठेवला आहे. आता घरात ज्याला कुणाला भूक लागेत, तो केवळ हे खाद्यपदार्थ गरम करून खाऊ शकतो. तीन मुलांची आई असलेल्या केल्सीने स्वतःच्या किचनमध्ये परिसरात उगवलेल्या भाज्यांना डब्यात बंद करून ठेवले आहे. तसेच तिने पहिल्यापासूनच तयार खाद्यपदार्थ, हर्ब्स, भात आणि पास्ता देखील स्टोअर केला आहे. केल्सीने किचनमध्ये एकूण 426 प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करून ठेवले आहेत. तिची आणि तिच्या कुटुंबाची 8 महिन्यांची गरज यामुळे भागणार आहे.
प्रत्येक गोष्टीला प्रिझर्व्ह करणे शिकले आहे. लोणच्यापासून मांसापर्यंत सर्व खाद्यपदार्थ दीर्घकाळापर्यंत संरक्षित ठेवू शकते. खाद्यपदार्थ प्रिझर्व्ह करण्यात 3 महिने लागतात आणि पुढील 8 महिन्यांपर्यंत स्वयंपाक करण्यापासून मुक्ती मिळत असल्याचे केल्सीने सांगितले आहे.
केल्सीला बाहेरील खाद्यपदार्थ खाणे आवडत नाही. याचमुळे तिने खाद्यपदार्थ प्रिझर्व्ह करणे सुरू केले. केल्सीचे कुटुंब घराच्या परिसरातच उगविलेल्या भाज्या अन् फळांचा आहार घेते. तर हिवाळय़ात या गोष्टी ती प्रिझर्व्ह करून ठेवते. दररोज ती दोन तास स्वतःच्या गार्डनमध्ये घालविते, तेथे भाज्या आणि फळांचे पीक ती घेते. तिचे जीवन पूर्णपणे ऑर्गेनिक अन्नावर निर्भर आहे. तिने पुस्तकांचे वाचन करून आणि ऑनलाइन व्हिडिओ पाहून अन्नपदार्थ प्रिझर्व्ह करण्यास सुरवात केली होती.