वृत्तसंस्था/ एर्नाकुलम
केरळ सरकारने एर्नाकुलम जिल्हय़ातील मुलानतुरूति येथील मार्थोमन जॅकोबाइट सीरियन चर्च सोमवारी स्वतःच्या ताब्यात घेतले आहे. 800 वर्षे जुने हे चर्च दीर्घकाळापासून जॅकोबाइट आणि ऑर्थोडॉक्स समुहांदरम्यान वादाचा मुद्दा ठरले होते. केरळ सरकारने ही कारवाई सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केली आहे. कब्जाची कारवाई रोखण्यासाठी चर्च परिसरात एकत्र आलेल्या जॅकोबाइट समर्थकांना हटविण्यासाठी बळाचा वापर करण्यात आला आहे.
12 व्या शतकात निर्माण करण्यात आलेल्या या चर्चचे संचालन जॅकोबाइट समूह करत होता. 3 जुलै 2017 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार हा चर्च ऑर्थोडॉक्स समुहाकडे हस्तांतरित केला जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अनेक चर्च ऑर्थोडॉक्स समुहाला सोपविण्यात आले असून कुणीच विरोध केलेला नाही. केरळ सरकारने न्यायालयाच्या आदेशावर अंमलबजावणी करण्यास विलंब केला असता ऑर्थोडॉक्स समुहाने याविरोधात पुन्हा न्यायालयात धाव घेतली होती. मार्थोमन चर्च गोथिक स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.
मार्थोमन चर्चप्रकरणी ऑर्थोडॉक्स समुहाने केरळ उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही चर्चचा ताबा दिला जात नसल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले होते.