वृत्तसंस्था/ मुंबई
बांधकाम क्षेत्रातील कंपनी मॅक्रोटेक डेव्हलपर्स ही कंपनी आगामी काळामध्ये बेंगळूरमध्ये दोन गृहबांधणी प्रकल्प विकसित करणार असून याकरता कंपनी जवळपास 800 कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अभिषेक लोढा यांनी ही माहिती दिली आहे.
लोढा ब्रँड अंतर्गत कंपनीचे प्रकल्प मुंबई मेट्रोपोलीटन रीजन व पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. मागच्या वर्षी जूनमध्ये कंपनीने बेंगळूर शहरामध्ये पदार्पण करण्याचा निर्णय घेतला होता. या महिन्यामध्ये बेंगळूरमध्ये कंपनीचा पहिला प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीमध्ये कंपनी आपला दुसरा प्रकल्प सुरू करण्याची इच्छा बाळगून आहे.