आतापर्यंत 5,917 नमुन्यांचे अहवाल प्राप्त : जिल्हय़ात आणखी पाच पॉझिटिव्ह, कोरोना सक्रिय रुग्ण 84
- जिल्हय़ात एकूण 271 जण कोरोना मुक्त
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ात कोविड-19 लॅब झाल्यामुळे कोरोना नमुना तपासणीचे प्रमाण वाढले असून आतापर्यंत 5 हजार 917 नमुने तपासण्यात आले आहेत. दरम्यान जिल्हय़ात गुरुवारी आणखी पाच पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या 361 वर पोहोचली आहे. तर आणखी एका रुग्णाला डिस्चार्ज दिला गेल्याने कोरोना सक्रिय रुग्ण 84 आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
जिल्हय़ात कोविड-19 लॅब नसताना कोरोना नमुना तपासणी कोल्हापूर येथे होत होती. त्यामुळे रिपोर्ट येण्यास वेळ लागत होता. मात्र कोविड लॅब झाल्यापासून कोरोना नमुना तपासणीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण ठेवणे शक्मय होत आहे. जिल्हय़ात कोरोना नमुना तपासणीसाठी आतापर्यंत 6 हजार 51 नमुने घेण्यात आले. त्यापैकी 5 हजार 917 नमुने तपासण्यात आले असून त्यातील 5 हजार 559 नमुने निगेटिव्ह आले, तर 361 पॉझिटिव्ह आले आहेत.
जिल्हय़ात गुरुवारी आणखी पाच पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामध्ये मालवण येथे घेण्यात आलेल्या रॅपिड टेस्टमध्ये दोन पॉझिटिव्ह अहवाल आले, तर कणकवली तालुक्यातील नांदगाव एक, कणकवली शहर एक आणि सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली येथे एक या प्रमाणे रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोना बाधित रुग्ण संख्या 361 झाली आहे. तर एक रुग्ण बरा झाल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला. आजपर्यंत एकूण 271 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 46 संशयित रुग्णांवरही उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.
तपासण्यात आलेले एकूण नमुने 6051
अहवाल प्राप्त झालेले नमुने 5917
आतापर्यंत पॉझिटिव्ह नमुने 361
निगेटिव्ह आलेले नमुने 5559
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 134
सद्यस्थितीत जिल्हय़ातील सक्रिय रुग्ण 84
मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 6
डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 271
विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण 127
गुरुवारी तपासणी केलेल्या व्यक्ती 4424
संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 18197
शासकीय संस्थांमधील अलगीकरणातील व्यक्ती 52
गाव पातळीवरील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 14710
नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 3435
2 मेपासून जिल्हय़ात आलेल्यांची संख्या 158227
सद्यस्थितीत सक्रीय कंटेनमेंट झोन 37