सावंतवाडी तहसिलदार श्रीधर पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारवाई
सावंतवाडी प्रतिनिधी
बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर चालकावर धडक कारवाई मोहीम आज मुंबई- गोवा इन्सुली आरटीओ चेक नाक्याजवळ महसूल विभागाने राबवली. सावंतवाडी तहसिलदार श्रीधर पाटील यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या धडक मोहिमेत जवळपास नऊ डंपर सापडले. सात डंपर मधून गोव्याकडे वाळू नेत असताना कारवाई करण्यात आली. तर दोन डंपर मधून ओव्हरलोड काळा दगड नेण्यात येत होता. असे एकूण नऊ डंपर वर जवळपास 12 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तहसिलर श्रीधर पाटील यांच्या नेतृत्वाखाली महसुली विभागाचे तलाठी यांच्या टीमने आज सकाळी मुंबई गोवा हायवेवर धडक मोहीम राबवली. यात बांदा पोलिसांनी सहकार्य केले. महसूल विभाग आता सावंतवाडी तालुक्यात बेकायदा वाळू उत्खनन व वाहतुकीवर करडी नजर ठेवून आहे.