बालपणी शिक्षक मुलांना प्राण्यांची नावे कशी आठवावीत हे शिकवायचे. यावेळी छायाचित्रे असायची आणि फळय़ावर प्राण्यांची नावे लिहिण्यास सांगण्यात यायचे. जगात सिंह, चित्ता, वाघासह अन्य अनेक प्राणी आहेत, ज्यांची नावे देखील आम्हाला माहिती नाहीत. सध्या ब्रिटनमधील एका प्राण्याची मोठी चर्चा होतेय. हा प्राणी 90 वर्षांनी प्राणिसंग्रहालयात जन्माला आला आहे.
या प्राण्याचे नाव आर्डवार्क आहे. याचा जन्म 4 जानेवारी रोजी झाला आहे. जन्माला आलेला प्राणी मादी असून प्राणिसंग्रहालयाने बेबी आर्डवार्कचे छायाचित्र शेअर केले आहे. चेस्टर प्राणिसंग्रहालयाचे टीम मॅनेजर डेव व्हाइट यांनी प्राणिसंग्रहालयात जन्माला येणारा हा पहिला आर्डवार्क असल्याने तो महत्त्वपूर्ण असल्याचे म्हटले आहे.
हा प्राणी पाहण्यास हॅरी पॉटरमधील कॅरेक्टर डॉबीशी मिळताजुळता आहे. याचमुळे त्याचे टोपणनाव डॉबीच ठेवण्यात आले आहे. हा प्राणी अत्यंत नाजुक असल्याने त्याची विशेष काळजी घेतले जातेय. प्राणिसंग्रहालय व्यवस्थापन त्याच्याप्रकरणी कुठल्याही प्रकारची जोखीम घेण्यास तयार नाही
हा मूळचा आफ्रिकेतील प्राणी आहे. आफ्रिकन भाषेत आर्डवार्क म्हणजे ‘अर्थ पिग’ असा होतो. हा प्राणी नाक्टर्नल ऍनिमल मुंग्या आणि वाळवी शोधण्यासाठी स्वतःच्या लांब नाकाचा वापर करतो. गंधशक्तीच्या वापराद्वारे तो स्वतःची शिकार पकडतो. याची जीभ 25 सेंटीमीटरपर्यंत लांबीची असते. या प्राण्याला पाहिल्यावर लोकांना मोठा आनंद झाला आहे. अनेकांनी या प्राण्याच्या सौंदर्याचे कौतुक पेले आहे. जगभरातील प्राणिसंग्रहालयांमध्ये केवळ 190 आर्डवार्क आहेत