A acre of cashew nuts at Nhawale Ravatewadi burnt the horticulture
न्हावेली रेवटेवाडी येथील काजू बागेत विद्युत वाहिन्यांमध्ये शॅार्टसर्किट होऊन सुमारे एक एकर वरील काजू बागेला आग लागली . ग्रामस्थांनी वेळीच धाव घेतल्यामुळे मोठी आर्थिक हानी टळली . विज प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधूनही विद्युत खांब व जीर्णवाहिन्यांकडे पुर्णत दुर्लक्ष झाल्यामुळेच असा प्रकार घडल्याचा आरोप काजू बागायतदार प्रसाद हळदणकर यांनी केला .न्हावेली रेवटेवाडी येथील क्शशिकांत हळदणकर यांच्या काजू बागेस दुपारच्या सुमारास अचानक आग लागली धुक्याचे लोट लांबून दिसल्यामुळे ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली सदर परिसरात विद्युत खांब व जीर्ण वाहिन्या वीज वितरणच्या निदर्शनास आणूनही दुर्लक्ष झाला . त्यामुळेच आपल्या बागायतीला शॅार्टसर्किटमुळे आग लागली . यात सुमारे वीस ते पंचवीस झाडे जळाली असून पन्नास हजारांचे नुकसान झाले आहे प्रशासनाने आमचे भविष्यात होणारे नुकसान टाळण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी व झालेली नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी काजू बागायतदार शेतकरी प्रसाद हळदणकर यांनी केली आहे .
न्हावेली / वार्ताहर