कालबाह्य मावा व परराज्यातून आणलेले पराठे जप्त
प्रतिनिधी / मडगाव
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन (एफडीए)ने आपल्यामोहिमेत पराठे आणि कालबाहय़ झालेला मावा जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या पराठाची किंमत 34 हजार रूपये तर मावाची किंमत सुमारे 157000 रूपये होत आहे. एफडीएच्या अधिकाऱयांनी म्हापसा, फातोर्डा व दवर्ली येथे ही कारवाई केली.
राज्याबाहेर उत्पादित आणि लक्झरी बसमधून वाहतूक केल्या जाणाऱया पराठय़ांवर अन्न सुरक्षा कायदा आणि गोव्यातील अन्न व्यवसाय ऑपरेटर तरतुदींनुसार लेबल लावलेले नव्हते तसेच खाद्यपदार्थ विक्रीचा परवाना धारण केलेला नव्हता. विपेत्याकडे कोणतेही खरेदी बिल किंवा बीजक उपलब्ध नव्हते. त्यामुळे पराठा जप्त करण्यात आले.
म्हापसा येथील कारवाईत 590 किलो कालबाह्य मावा जप्त करण्यात आला. दवर्ली येथून 120 किलो मावा व अन्य मिठाई जप्त करण्यात आली तर फातोर्डा येथून 60 किलो मावा जप्त करण्यात आला. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचा परवाना नसताना दवर्ली व फातोर्डा येथून व्यवसाय केला जात असल्याचे कारवाईतून उघड झाले.
म्हापसा येथील कारवाईत मावा योग्य लेबल नसल्याने तसेच योग्य पॅकिंगशिवाय व खरेदीचे बिल नसल्याने कारवाई करण्यात आल्याची माहिती एफडीएने दिली आहे. मिठाईच्या दुकानदारांकडे अन्न व्यवसाय ऑपरेटरचा परवाना नसलेल्यांना मिठाई तयार करण्याची प्रक्रिया थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.