A blood donation camp was held on the occasion of Ketan Kumar Sawant’s birthday
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सावंतवाडी पुरस्कृत महाराष्ट्र सैनिक जादूगार केतन कुमार सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे रक्तदान शिबिर २७ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आले होते. यावेळी हाॅस्पिटलमधील रूग्णाना, त्याच्या नातेवाईकांना चहा बिस्कीट व पोहे वाटप केले.
या कार्यक्रमाच उद्घाटन मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ, उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर, बालरोग तज्ञ डॉ. संदीप सावंत, आयुर्वेदिक तज्ञ डॉ. सागर जाधव, जिल्हा सचिव बाळा पावसकर, तालुका अध्यक्ष गुरुदास गवंडे, परिवहन जिल्हाध्यक्ष ॲड. राजू कासकर, माजी उपजिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर, माजी शहराध्यक्ष अभिमन्यू गावडे, कुडाळ प्रभारी तालुकाध्यक्ष सचिन सावंत, मनविसे कॉलेज युनिट अध्यक्ष साहिल तळकटकर, अर्पिता मळेकर, दिपाली राऊळ, अनुष्का मळेकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
सावंतवाडी / प्रतिनिधी