धरणे आंदोलन मागे, आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर उपजिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल
पेडणे : मोरजी येथील टॅक्सी व्यावसायिक संजय कोले यांना मारहाण केल्याप्रकरणी नरेंद्र शेटगावकर, शेखर म्हापसेकर यांच्या विऊद्ध पेडणे पोलिसांनी फौजदारी कलम 107 नुसार गुन्हा नोंद केला. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी संजय कोले यांनी धरणे आंदोलन मागे घेतले. चेतन कामत यांनी त्यांना फळाचा रस देऊन आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले. संजय कोले यांना बारा दिवसांपूर्वी मोरजी येथे टॅक्सी व्यावसायिकांकडूनच मारहाण झाली होती. 19 रोजी संजय कोले यांनी पोलिसांत तक्रार देताना सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांना सादर केले होते. परंतु तक्रार नोंदवण्यास तब्बल बारा दिवस पेडणे पोलिसांना लागले. आपल्याला न्याय मिळणार नाही, आपल्या जीवाला भीती आहे या अनुषंगाने कोले यांनी सोमवार दि. 29 रोजी पेडणे शासकीय कॉम्प्लेक्ससमोर धरणे आंदोलन सुरू केले होते. पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा नोंद करून कारवाई न केल्यास आपल्यासमोर आत्मदहन करण्याशिवाय पर्याय नाही, असा इशारा दिला होता.
उपजिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाईची सूचना
दरम्यान या घडलेल्या प्रकाराची दखल पेडणे उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर यांनी घेऊन पेडणे पोलिसांकडे चर्चा करून योग्य ती कारवाई करण्याची सूचना केली होती. त्यानुसार पेडणे पोलीस निरीक्षक सचिन लोकरे यांनी संबंधितांवर गुन्हा नोंद करून चाप्टर केस पेडणे उपजिल्हाधिकारी न्यायालयात पाठवून दिली आहे.
टॅक्सी व्यावसायिक, पत्रकारांचे सहकार्य : कोले
दुसऱ्याही दिवशी आपल्याला टॅक्सी व्यावसायिक, पत्रकार बंधूंनी योग्य ते सहकार्य केले. अॅड. प्रसाद शहापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनाला सुऊवात केली. टॅक्सी व्यावसायिकांचे प्रश्न वेळोवेळी आपण प्रसार माध्यमातून मांडत असल्याने आपल्याला मारहाण झाल्याचा दावा संजय कोले यांनी केला.
कोले यांचे आंदोलन लोकशाहीच्या मार्गाने : कामत
संजय कोले यांच्यावर झालेला अन्यायाला वाचा फोडण्यासाठी लोकशाहीच्या मार्गातून त्यांनी धरणे आंदोलन सुरू केले. 29 रोजी आपण पेडणे उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे चर्चा केली. त्यांनी आपल्याला सकारात्मक संकेत दिले होते. त्यानुसार आज फौजदारी कलमाखाली गुन्हा नोंद करून कोले यांना न्याय मिळवून दिल्याबद्दल उपजिल्हाधिकारी वियंगणकर यांना गोवा टॅक्सी व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष चेतन कामत यांनी धन्यवाद दिले.
टॅक्सी व्यावसायिकांनी प्रामाणिक व्यवसाय करावा
पेडणे पोलिसांनी यापुढे कोणाच्याही दबावाखाली न राहता स्वतंत्रपणे कायद्याची अंमलबजावणी करावी, पत्रकारांनी दिलेले सहकार्य आणि व्यावसायिकांनी दिलेला पाठिंबा त्यामुळेच हे आंदोलन यशस्वी ठरल्याचे चेतन कामतने सांगून टॅक्सी व्यावसायिकांनी प्रामाणिक व्यवसाय करावा, कधीच कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन कामत यांनी केले.
अखेर कोलेंना न्याय मिळाला : शहापूरकर
लोकशाहीच्या मार्गाने संजय कोले यांनी धरणे आंदोलन सुरू केले. त्यांना पाठिंबाही मिळाला, सरकारी यंत्रणा जागी झाली. उशिरा का होईना उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंद करून संजय कोले यांना न्याय दिला, असे प्रसाद शहापूरकर म्हणाले.