सातारा प्रतिनिधी
जिल्ह्यातील माण तालुक्यातील येळेवाडी येथील वृद्ध महिलेस चाकूचा धाक दाखवून जबरीने रोख रक्कम आणि शेळी घेऊन गेलेल्या माळेगाव (बारामती) येथील दोन आरोपींना दहिवडी पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत एक तासात दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 1 लाख 34 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.. या कारवाईनंतर दहिवडी पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे