महिलेला नेले फरफटत : ड्रायव्हरला चोप
मडगाव : बाळ्ळी येथे मासे वाहतूक करणाऱ्या कंटेनरची दुचाकीस जोरदार धडक बसली. या अपघातात दुचाकीवरील तरूण आणि महिला जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलात दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर घटनास्थळावरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या कंटेनरचालकास स्थानिकांनी पकडून बराच चोप दिला. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 17 वर बाळ्ळी ते काणकोण मार्गावर हा अपघात झाला. संध्याकाळी साडेतीनच्या सुमारास मासळी वाहतूक करणाऱ्या कंटेनरचे रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील तरूण आणि महिला यांना दुखापत झाली आहे. सुदैवाने दोघेही बचावले. तथापि, त्यांच्या अंगावर मोठ्या जखमा झाल्या आहेत. सर्वेश असे या जखमी युवकाचे नाव आहे. त्याच्या दुचाकीवर पाठीमागच्या सीटवर त्याची मावशी बसली होती. दोघांनाही दुखापत झाली असून धडकेमुळे गाडीवरून पडल्याने उभा राहण्याची क्षमता दोघांमध्ये नव्हती. कंटेरनने संबंधित महिलेला सुमारे 50 मीटर फरफटत नेले. अपघाताला कारणीभूत ठरलेला मासे वाहू कंटेरनची नोंदणी कर्नाटक राज्यात करण्यात आलेली आहे. चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न करताच संपप्त झालेल्या स्थानिकांसह वाहनचालकांनी संबंधित चालकाला पकडून ठेवत त्याला चोप दिला.