खोची- वार्ताहर
खोची ता.हातकणंगले येथील एस.टी.स्टँड परिसरातील माजी उपसरपंच एम.के.चव्हाण यांच्या वाहने लावण्याच्या शेडमध्ये मगरीला जेरबंद करण्यात आले. मंगळवारी रात्री दोन वाजता छत्रपती वाईल्ड लाईफ फौंडेशनच्या सदस्यांनी मगरीस जेरबंद केले. एस. टी.स्टँड परिसरातील गावतळयातून मगर बाहेर आली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
गावतळयात यापूर्वी वर्षभरात पाच ते सहा मगरींना पकडण्यात आले आहे. त्यामुळे गावतळयात मगरींचे अजूनही काही मगरींचे वास्तव्य असण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी परिसरातील नागरिकांनी सतर्कता दाखवत वनविभागाचे साताप्पा जाधव आणि छत्रपती वाईल्ड लाईफ फाऊंडेशनचे तेजस जाधव, अमर चव्हाण, अमोल सुतार, अक्षय मगदूम, गणेश नंदेश्वर, सचिन निकम, राकेश शिखरे यांनी मगरीला अत्यंत शिताफीने पकडून वनविभाग,कोल्हापूर यांच्या स्वाधीन केले. पकडलेल्या मगरीला नैसर्गिक आधिवासात सोडण्यात येणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.