बटाटा आणि बेसन पिठाची गोल कुरकुरीत भजी आपण नेहमी खातो.ही भजी जास्त तेलकट देखील होते. त्यामुळे ती जास्त खाल्ली जात नाही. म्हणूनच आज आपण बटाटयाच्या भजीची एक वेगळी रेसिपी जाणून घेणार आहोत.
साहित्य
बटाटे ३
पोह्याचं पीठ २ टे स्पून
बेसन २ टे स्पून
कोथिंबीर
हिरवी मिरची ४-५
लसूण पाकळ्या ७-८
आलं १ इंच
ओवा १/२ टी स्पून
मीठ
कृती
सर्वप्रथम बटाट्याची साले काढून घ्यावीत. यानंतर बटाटे मोठ्या किसनीने किसून घ्यावेत.बटाट्याचा किस काळा पडू नये यासाठी तो पाण्यात घालून ठेवावा. यानंतर पोहे मिक्सरला वाटून बारीक पीठ करावं.यानंतर किसलेल्या बटाट्यामधून सर्व पाणी काढून घ्यावे. त्यामध्ये २ चमचे पोह्याच पीठ आणि बेसनाचे पीठ घालावं. त्याचबरोबर लसूण,मिरची आणि आले वाटून घेऊन बटाट्यामध्ये घालावे.आणि सर्व मिश्रण एकत्र करून घ्यावे. तयार झालेल्या मिश्रणामध्ये कोथिंबीर , अर्धा चमचा ओवा आणि चवीनुसार मीठ घालून सर्व पीठ एकजीव करून घ्यावं. यानंतर गॅस वर तेल गरम करत ठेवावे. आणि मंद आचेवर भजी टाळून घ्यावी.तुम्ही देखील बटाट्याची ही वेगळी भजी एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्की आवडेल.