गोवा फॉरवर्डकडून तक्रार दाखल
प्रतिनिधी/ पणजी
गोवा फॉरवर्ड पार्टीचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांचे छायाचित्र वापरून बनावट फेसबुक खाते तयार करण्यात आले असल्याची तक्रार पार्टीतर्फे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेत दाखल करण्यात आली आहे.
अशाप्रकारे तयार करण्यात आलेल्या या बनावट खात्याच्या माध्यमातून सदर भोंदूंकडून असंख्य लोकांना ’फ्रेंड रिक्वेस्ट’ पाठविण्यात आल्या आहेत. तसेच ’गुगल पे’ च्या माध्यमातून 8402865618 या मोबाईल क्रमांकावर पैसे पाठविण्याची मागणी करण्यात येत आहे, असे सदर तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी आवश्यक कलमांखाली त्वरित एफआयआर नोंद करून प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी विनंती या तक्रारपत्रातून करण्यात आली आहे.