9 ते 15 ऑक्टोबर या कालावधीत हे आहेत कार्यक्रम
वार्ताहर/ कुडाळ
विशाल फाउंडेशन व भाजपच्या वतीने भाजपचे युवा नेते तथा युवा उदयोजक विशाल परब यांचा वाढदिवस सोहळा 9 ते 15 ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. ९ ऑक्टोबर रोजी येथील वासुदेवानंद ट्रेड सेंटर येथे सायंकाळी पाच वाजता विशाल परब यांचा वाढदिवस साजरा होत आहे. “विशाल अभिष्टचिंतन सोहळा माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थित होणार आहे. यानंतर प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. इंदुरीकर महाराज यांचा कीर्तन सोहळा सायंकाळी ६ ते ९ यावेळेत होणार आहे.अशी माहिती ओरोस मंडळ अध्यक्ष दादा साईल व तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
कुडाळ एमआयडीसी येथील शासकीय विश्रामगृह येथे बुधवारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी ही माहीती दिली.या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नारायण राणे,पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती आहे.दादा साईल म्हणाले, विशाल परब यांचा वाढदिवस दरवर्षी मोठ्या उत्साहात व विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने “विशाल सप्ताह साजरा करण्यात येत आहे. ९ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ९ रोजी येथील वासुदेवानंद ट्रेड सेंटर येथे सायंकाळी पाच वाजता विशाल परब यांचा वाढदिवस साजरा होत आहे. प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. इंदुरीकर महाराज यांचा कीर्तन सोहळा सायंकाळी ६ ते ९ यावेळेत होणार आहे.
११ रोजी दोडामार्ग येथे सायंकाळी 7 वाजता होममिनिस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. १३ रोजी वेंगुर्ले येथील कॅम्प स्टेडियम येथे सायंकाळी ७ वाजता “विशाल दांडिया” स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेत नामांकित संघ सहभागी होणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही पहिलीच भव्य दिव्य दांडिया स्पर्धा आहे.
१५ रोजी सुप्रसिद्ध गायक जुबीन नौटीयाल यांचा सावंतवाडी जिमखाना मैदानावर LIVE CONCERT हा जगातील नंबर वनचा लाईव्ह गाण्याचा शो होणार आहे. महाराष्ट्र व गोव्यात पहिल्यांदाच हा शो होत आहे. सुमधूर संगीताने जगातील तरुण-तरुणींना भुरळ घालणाऱ्या जुबीन नौटीयाल पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळणार आहे. वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन कुडाळ तालुकाध्यक्ष दादा साईल व संजय वेंगुर्लेकर यांनी केले आहे.