A fire broke out in the orchard of businessman Sudesh Malik in Dodamarg
फार्म हाऊस आगीच्या भक्ष्यस्थानी, लाखोंचे नुकसान
दोडामार्ग बाजारपेठेतील कापड दुकानदार सुदेश मळीक यांच्या दोडामार्ग येथील शेती प्लॉटमध्ये आग लागली यामध्ये त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने वेळीच आगीवर नियंत्रण आणल्याने मोठे नुकसान टळले असले तरीही लाखो रुपयांचे नुकसान मात्र झाले.
मंगळवारी तीन वाजण्याच्या सुमारास तप्त उन्हात आग भडकली. मळीक यांचे फार्म हाऊस दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाच्या समोरील बाजूस गोवा – महाराष्ट्र हददीवर आहे. सदर आग गोव्याच्या दिशेहून मळीक यांच्या बागेत आली. मळीक यांचे दोडामार्ग बाजारपेठेत कापड दुकान आहे. त्याठीकाणचा काही माल ते फार्म हाऊसवरही ठेवतात. आग जमिनीत आल्यावर पहिल्यांदा फार्म हाऊस पेटले त्यामुळे वीज कनेक्शन जळाले. आग लागल्याची माहिती ओमकार रेडकर यांनी मित्रपरिवाराला दिली आणि बाजारपेठेत ही घटना समजताच नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांसह मयुरेश नाईक, वैभव रेडकर, ओमकार रेडकर, विष्णू लोंढे, समीर रेडकर, राजेश गावडे, राजेश फुलारी, मनोज पार्सेकर, देविदास नाईक, नगरपंचायत कर्मचारी घटनास्थळी पोहचले. आजूबाजूचे पाणी घेऊन आगीवर फवारणे शिवाय जंगल झाडीने आग थोपवणे असे केल्याने चार वाजण्याच्या सुमारास आग आटोक्यात आली मात्र तोपर्यंत मळीक यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले.
दोडामार्ग – प्रतिनिधी