शूटर्सनी स्कॉर्पिओमधून केला गोळीबार, संदीप बिश्नोईवर 9 गोळय़ा झाडल्या
जयपूर / वृत्तसंस्था
राजस्थानमधील नागौर न्यायालय परिसरात सोमवारी दिवसाढवळय़ा टोळीयुद्ध झाले. गोळीबार करणाऱयांनी कुख्यात गँगस्टर संदीप बिश्नोई याला न्यायालयाच्या आवाराबाहेर पोलिसांसमोर गोळय़ा घातल्या. या गोळीबारात त्याचा जागीच मृत्यू झाला. संदीप बिश्नोई हा सध्या नागौर कारागृहात कैद होता. हरियाणातील कुख्यात गुंड आणि सुपारी किलर अशी त्याची ओळख असून तो सेठी टोळीशी संबंधित होता. पोलीस अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, तो दारू तस्करीसोबत सुपारी देऊन हत्या करायचा. त्याने नागौर येथील एका व्यापाऱयाची हत्याही केली होती. याच प्रकरणात सध्या तो अटकेत आहे.
नागौर पोलिसांनी गँगस्टर संदीपला दुपारी न्यायालयात हजर करण्यासाठी आणले होते. यादरम्यान कारमधून आलेल्या शूटर्सनी त्याला गोळय़ा घालून ठार केले. गोळीबार करणारे हल्लेखोर हरियाणातील असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व शूटर्स काळय़ा रंगाच्या स्कॉर्पिओमधून आले होते. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी नागौर परिसरात नाकाबंदी केली आहे. शोधमोहिमेवेळी सर्व वाहनांची तपासणी केली जात होती. या घटनेनंतर न्यायालयाबाहेर मोठी गर्दी झाली होती.