जीवरक्षकांची नियुक्ती, बायो टॉयलेटची व्यवस्था करणार. : वनखात्यातर्फे विशेष मोहीम राबविणार.
उदय सावंत/वाळपई
सत्तरी तालुक्मयाचे अनेक ठिकाणी पावसाळी मौसमत कोसळणाऱया धबधब्यावर अनेक प्रकारच्या सुविधांची वानवा होती . यामुळे पर्यटकांकडून अनेक वेळा नाक मुरडणे सतत सुरू होते. अनेक धबधब्यावर सुरक्षिततेची कमतरता होती. यामुळे दुर्दैवी घटना घडत होत्या. याची विशेष दखल घेऊन खात्याने एक विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे .सत्तरी तालुक्मयातील काही निवडक धबधब्यावर विविध स्वरूपाच्या सुविधा निर्माण करण्यात येणार असून याची कार्यवाही सुरू झालेली आहे.
वनखात्याचे मंत्री विश्वजीत राणे यांनी यासंदर्भाचे आदेश दिले असून वनखात्याने या संदर्भात विशेष आराखडा तयार केलेला आहे. या आराखडय़ाच्या माध्यमातून विविध धबधब्यावर अनेक प्रकारच्या सुविधा निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे.
अनेक ठिकाणी धबधबे प्रवाहित.
सत्तरी तालुक्मयाच्या अनेक ठिकाणी डोंगरावरून सुंदर प्रपात कोसळत आहेत. हा नयनरम्य नजारा पाहण्यासाठी गोव्याच्या वेगवेगळय़ा भागातून मोठय़ा प्रमाणात पावसाळी मोसमात पर्यटक गर्दी करताना दिसत आहेत. पावसाळी मौसमामध्ये जवळपास पाच महिने हे धबधबे प्रवाहित होत असतात. प्रचंड प्रमाणात पर्यटक या धबधब्यावर मौजमजा व सहलीसाठी येत असतात. तालुक्मयातील चरावणे, हिवरे ,पाली नानेली, कुमठोळ ,सालेली, साटरे आदी धबधबे सध्यातरी बहुचर्चित आहेत.
जीव रक्षकांची नियुक्ती करण्यात.
धबधब्याच्या ठिकाणी गेल्या दोन वर्षात अनेक प्रकारच्या दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत. जवळपास वीस दिवसापूर्वी साटरे येथील धबधब्यावर वास्को येथील दोन तरुणांना दुर्दैवी मरण आले होते. जीव रक्षकांची कमतरता यामुळे या दुर्दैवी घटना घडल्या होत्या. शहरी भागातील पर्यटकांना सत्तरी तालुक्मयातील नद्यांचा अंदाज येत नसल्यामुळे अशा दुर्दैवी घटना घडतात. यामुळे गावाची बदनामी होत असते. याची विशेष दखल घेऊन या धबधब्यावर जीवरक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे ?.प्रत्येक धबधब्यावर दोन जीवरक्षक ठेवण्यात येणार असून यामुळे दुर्दैवी स्वरूपाच्या घटना घडणार नाहीत .त्याचप्रमाणे पर्यटकांच्या हुल्लडबाजीवथ मोठय़ा प्रमाणात नियंत्रण येणार असल्याचे वनखात्याच्या सूत्रांचे म्हणणे आहे.
बायो टॉयलेटची व्यवस्था करणार.
सत्तरी तालुक्मयातील सर्वच धबधबे घनदाट जंगलामध्ये आहेत. धबधब्यावर येणाऱया पर्यटकांना नैसर्गिक विधीसाठी सोय नाही. यामुळे पर्यटक उघडय़ावर नैसर्गिक विधी करतात. यामुळे धबधब्याच्या परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण होत असते. याची विशेष दखल घेऊन या धबधब्यावर बायो टॉयलेटची व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रत्येक धबधब्यावर किमान दोन टॉयलेट उपलब्ध करण्यात येणार असून यामुळे उघडय़ावर नैसर्गिक विधीसाठी संधी उपलब्ध होणार नाही. त्याचप्रमाणे खास करून महिलांसाठी कपडे बदलण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.
प्रत्येक पर्यटकाकडून शंभर रुपयाची शुल्क.
धबधब्यावर येणाऱया प्रत्येक पर्यटकाकडून शंभर रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. या निधीच्या माध्यमातून धबधब्याच्या परिसरामध्ये साफसफाई व इतर स्वरूपाच्या सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून या निधीचा चांगल्या प्रकारे वापर होणार आहे. येणाऱया पर्यटकांना पूर्णपणे सुरक्षितता निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून वनाखात्यांची ही विशेष मोहीम हाती घेण्यात येणार असून या संदर्भाचे निर्देश वनमंत्रातर्फे देण्यात आलेले आहेत?.या संदर्भाचा आराखडा तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून येणाऱया आठ दिवसांमध्ये ही व्यवस्था करण्याच्या दृष्टिकोनातून प्राधान्याने लक्ष देण्यात येणार असल्याचे वनखात्याच्या सूत्रांनी प्रस्तुत प्रतिनिधी बोलताना स्पष्ट केले आहे.
तर ग्रामीण भागाच्या विकासाला मोठय़ा प्रमाणात चालना.
सत्तरी तालुक्मयाच्या निसर्ग पर्यटनाला चालना द्यायची असेल त्या धबधब्याच्या ठिकाणी अनेक प्रकारच्या सुविधा निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे. अशा प्रकारचा विचारप्रवाह सुरू झाल्यानंतर वनखात्याने हाती घेतलेली ही मोहीम येणाऱया काळात सत्तरी तालुक्मयाच्या ग्रामीण भागाच्या विकासाला विशेष चालना प्राप्त होणार आहे. तालुक्मयाच्या निसर्ग सौंदर्याचा नजराणा पाहण्याची संधी पर्यटकांना उपलब्ध होणार असून यामध्ये आता सुविधाची भर पडणार असल्यामुळे पर्यटकांची गर्दी आणखी वाढण्याची शक्मयता वनखात्याच्या सूत्रांनी व्यक्त केलेली आहे.