प्रतिनिधी /बेळगाव
चाळीस दिवस चालणाऱया आणि रोबोटिक बर्ड्सद्वारा बेळगावकरांचे मनोरंजन करण्यासाठी विविध राईडसह आलेल्या बेळगाव फनफेअरचा शुभारंभ रविवारी सायंकाळी सीपीएड कॉलेज मैदानावर करण्यात आला.
वृंदावन एक्झीबिशनतर्फे आयोजित प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार मंगला अंगडी, उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी पायोनियर बँकेचे चेअरमन प्रदीप अष्टेकर, यश कम्युनिकेशनचे संचालक प्रकाश कालकुंद्रीकर, विनय कदम, महांतेश हुलवी, एच. एम. कळस, कुंतीनाथ कलमनी व मान्यवर उपस्थित होते. प्रदर्शनामुळे बेळगावकरांचे मनोरंजन होईल, अशी आशा आमदार बेनके यांनी व्यक्त केली.
प्रदर्शनाचे आयोजक एस. के. पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करून आभार मानले. या प्रदर्शनात रोबोटिक बर्डसबरोबरच संपूर्ण कुटुंबाच्या मनोरंजनासाठी विविध राईड्स तसेच कंझ्यूमर ज्वेलरी, गार्मेंट्स, फन गेम्स, खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही भरविण्यात
आले आहेत.