तयार कपड्यांचा मोठा साठा खाक : मदतकार्यासाठी फोंडा, कुंडई, सावर्डे व मडगावातून अग्नीशामक बंब
फोंडा : फोंडा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या हॉटेल मेनिनो इमारतीच्या तळमजल्यावरील
आचल टॅक्सटाईल्स या तयार कपड्यांच्या दुकानाला मंगळवारी सायंकाळी भिषण आग लागली. त्यात दुकानातील कपड्यांचा मोठा साठा तसेच फर्निचर व अन्य वस्तू जळाल्या. या दुर्घटनेत दुकानमालकाची मोठी आर्थिक नुकसानी झाली असून त्याचा नेमका आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही.
एसी यंत्रणेने शॉर्ट सर्किटमुळे घेतला पेट
फोंडा अग्नीशामक दलाचे पथक तसेच आसपासचे दुकानदार व इतर लोक वेळीच मदतीसाठी धावल्याने दुकानातील काही प्रमाणात कपड्यांचा साठा बाहेर काढणे शक्य झाले. आगीच सापडलेल्या या दुकानाच्या रांगेत अजून काही दुकाने असून त्याच्या वरच्या मजल्यावर तयार कपड्यांचे आणखी एक दुकान आहे. ही आग शेजारील दुकानात पोचण्यापूर्वी तिच्यावर नियंत्रण आणण्यात अग्नीशामक दलाच्या जवानांनी खबरदारी घेतली. पलंग यांच्या मालकीच्या आचल टॅक्सटाईल्स या दुकानात साड्या, तसेच महिला, पुऊष व मुलांसाठी लागणारे तयार कपडे विकले जातात. या दुकानात नेहमीच कपड्यांचा मोठा साठा असतो. शाळा सुऊ झाल्याने मुलांसाठी लागणारे गणवेशही मोठ्याप्रमाणात विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. मंगळवारी सायं. 5.30 वा. सुमारास दुकानातील एसी यंत्रणेला शॉर्ट सर्किट होऊन ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेच्यावेळी दुकान मालकीण, कर्मचारी व काही ग्राहक होते. एसी यंत्रणेने पेट घेताच सर्वजण धावून बाहेर आले. अग्नीशामक दलाचे पथक घटनास्थळी पोचण्यापूर्वी कपड्यांचा साठा व अन्य वस्तुंनी पेट घ्यायला सुऊवात केली होती. काचांनी बंदीस्त असलेल्या या दुकानात आंतमध्ये ही आग घुमसली व सर्वत्र धुराचे लोळ पसरले. मतद पथकाला आंतमध्ये शिरण्यासाठी बाहेरील कांचांचे दालन तोडून आंतमध्ये प्रवेश करावा लागला. प्रचंड धुरांमुळे मदतकार्यांत बरेच अडथळे आले. आगीचे भिषण स्वऊप लक्षात घेऊन फोंडा केंद्रातील दोन बंब तसेच कुंडई, सावर्डे व मडगांव येथून अतिरिक्त अग्नीशमन बंब मागविण्यात आले. फोंडा अग्नीशामक दलाचे स्टेशन अधिकारी सुशिल मोरजकर यांच्यासह अन्य कर्मचारी रात्री उशिरापर्यंत मदतकार्यात गुंतले होते.
लोकांची गर्दी व वाहतुकीचा खोळंबा
आगीत सापडलेले हे दुकान फोंडा बाजाराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर असून ही घटना नेमकी सायंकाळच्यावेळी घडल्याने कामावऊन परतणाऱ्या लोकांनी एकच गर्दी केली. मुख्य रस्त्यावरील वाहतूकही खोळंबून राहिली. मदतकार्यांत अडथळा ठरणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून फासरे प्रयत्न दिसले नाहीत. फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष रितेश नाईक यांच्यासह काँग्रेस नेते राजेश वेरेकर, मगो नेते डॉ. केतन भाटीकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.