एखादी व्यक्ती, सिनेमातील अभिनेत्री, राजकीय नेतेमंडळी, उद्योगपती इत्यादींच्या भाषणांना अगर वक्तव्यांना हजारो लाईक्स मिळणे आश्चर्यकारक नाही. तथापि, छायाचित्राच्या एका फोटोओळीने हजारो लोकांना वेड लावणे हा प्रकार क्वचित घडतो. प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी नुकतीच ट्विटरवर एक फोटो प्रसिद्ध केला आहे. मंगळ ग्रहावरून पृथ्वीचा काढण्यात आलेला हा फोटो आहे. असे अनेक फोटो आपल्याला सोशल मिडियावरून दिसून येतात. मंगळावर अमेरिका, चीन, भारत इत्यादींनी याने पाठविली आहेत आणि तेथून पृथ्वीवरचे छायाचित्र काढणे हे नवीन राहिलेले नाही. तथापि, आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या या फोटोचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांनी स्वतः तयार केलेली फोटोओळ, हे आहे. या फोटोत मंगळावरून पृथ्वी एखाद्या कपाळावर लावलेल्या बिंदीसारखी किंवा टिकलीसारखी दिसत आहे. महिंद्रा यांनी कॅप्शनमध्ये म्हटले आहे, की ‘इस तस्वीरसे हमे सिर्फ एक चीज सिखनी चाहिए, वह हैं विनम्रता!’ या कॅप्शनवर अनेकांनी त्यांच्या टिप्पण्या पोस्ट केलेल्या आहेत. ‘हम इस पुरे ब्रह्मांड में धूल के एक छोटेसे कण जैसे हैं।’ अशी प्रतिक्रिया एका ट्विटर युजरने केली आहे. अशाप्रकारच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. उद्योगपती महिंद्रा यांची संवेदनशीलनता आणि कल्पकता या कॅप्शनमधून दिसून येते, असे अनेकांनी म्हटले आहे.
Previous Articleआता घरोघरी रात्रं-दिवस फडकवता येणार राष्ट्रध्वज
Next Article खलिस्तानी दहशतवाद्यासाठी एनआयएकडून रोख बक्षीस
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.