ग्रामस्थ दहशतीत : तज्ञांचे पथक करणार पाहणी
वृत्तसंस्था/ कोट्टायम
केरळच्या कोट्टायम जिल्ह्यातील चेनापडी गावातील लोकांना जमिनीतून रहस्यमय आवाज ऐकू येतोय. हा आवाज कशाचा आहे आणि का ऐकू येतोय यासंबंधी कुठलीच माहिती मिळालेली नाही.
शुक्रवारी सकाळपासून दोनवेळा मोठा आवाज ऐकू आला आहे. यापूर्वी देखील या भागात अशाच प्रकारचा आवाज ऐकू आला होता. परंतु परिसरातील हवामानात कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही असे स्थानिकांचे सांगणे आहे.
केरळच्या खाण अन् भूविज्ञान विभागाचे पथक लवकरच संबंधित भागाचा दौरा करत आवाजासंबंधी संशोधन करणार आहे. चालू आठवड्याच्या प्रारंभी पहिल्यांदा जेव्हा आवाज ऐकू आला, तेव्हाच संबंधित ठिकाणी पाहणी करण्यात आली होती. आता पुन्हा मोठा आवाज ऐकू आल्याने आमचे तज्ञ लवकरच पाहणी करतील असे विभागाकडून सांगण्यात आले.
सेंट फॉर अर्थ सायन्सेसकडून वैज्ञानिक संशोधनाद्वारेच या आवाजांमागील कारणाचा शोध लावला जाऊ शकतो. अशाप्रकारच्या घटनांचे विश्लेषण करण्यात आम्हाला काही मर्यादा आहेत. याचमुळे आम्ही सेंटर फॉर अर्थ सायन्सेसला पाहणीची विनंती केल्याचे राज्याच्या भूविज्ञान विभागाकडून सांगण्यात आले.