तब्बल 165 पोलीस कर्मचाऱयांच्या बदल्या : अधीक्षक, उपअधीक्षक, हवालदारांचा समावेश
प्रतिनिधी / पणजी
पोलीस खात्यात काल गुरुवारी मोठी उलथापालथ करण्यात आली असून तब्बल 165 पोलीस कर्मचाऱयांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली झालेल्या पोलिसांमध्ये 2 अधीक्षक, 32 उपअधीक्षक, 16 सहाय्यक उपनिरीक्षक तसेच 32 हवालदार आणि 83 पोलीस कॉन्स्टेबल यांचा समावेश आहे.
दोन पोलीस अधीक्षकांच्या बदल्या करण्याचा आदेश गृह खात्यातून काढण्यात आला आहे तर इतर पोलिसांच्या बदल्यांचा आदेश पोलीस मुख्यालयातून काढण्यात आला आहे.
नव्या उपअधीक्षकांना दिला ताबा
निरीक्षकपदावरून उपअधीक्षकपदावर बढती मिळालेल्या काही उपअधीक्षकांना त्यांच्या नव्या पदाचा ताबा देण्यात आला नव्हता त्या उपअधीक्षकांनाही नव्या पदाचा ताबा देण्यात आला आहे. बदली झालेल्या पोलिसांनी त्वरीत आपल्या नव्या जागेचा ताबा घ्यावा, असे आदेशात म्हटले आहे.
तावारीस, वाल्सन यांच्या बदल्या
बदली झालेल्या दोन अधीक्षकांमध्ये सेमी तावारीस यांच्याकडे कोंकण रेल्वे, किनारी विभाग तसेच पीटीएस देण्यात आले आहे तर निधीन वाल्सन यांच्याकडे गुन्हा अन्वेषण विभाग, अमली पदार्थ विरोधी विभाग, एसबी व इओसी देण्यात आले आहे.
पणजी एसडीपीओपदी उपअधीक्षक सुदेश नाईक तर पेडणे एसडीपीओपदी सिध्दांत शिरोडकर यांची बदली झाली आहे. एसडीपीओ जीवबा दळवी, जीआरपी- उदय परब, एसडीपीओ वास्को- राजेश कुमार, एसडीपीओ केपे-नीलेश राणे, एएचटीयु उपअधीक्षक, निवडणूक विभाग तसेच महिला पोलीस उपअधीक्षक- मारीया मोन्सेरात, अमली पदार्थ विरोधी विभाग उपअधीक्षक नेर्लोन आल्बुकेर्क, एसडीपीओ काणकोणा- संदेश चोडणकर, उपअधीक्षक मुख्यालय उत्तर गोवा- ब्राझ मिनेझिस, उपअधीक्षक क्राईम सुरज हळर्णकर, एसडीपीओ मडगाव व क्राईम उपअधीक्षक- शिवेंदू भुषण, उपअधीक्षक इओसी- फ्रान्सिस कॉर्ता, एटीएस उपअधीक्षक राजन निगळे, एमटी उपअधीक्षक व्हिल्सन डिसोझा, जीआरपी उपअधीक्षक रुपेंद्र शेटगावकर, उपअधीक्षक कोंकण रेल्वे- गुरुदास कदम, मुख्यमंत्री सुरक्षा उपअधीक्षक तुषार वेर्णेकर, उपअधीक्षक पीटीएस वाळपई मनोज म्हार्दोळकर, उपअधीक्षक पोलीस मुख्यालय दक्षिण गोवा- राजेंद्र प्रभूदेसाई, उपअधीक्षक एसपीसीआर रॉय परेरा, उपअधीक्षक मुख्यालय प्रशासन हरिश्चंद्र मडकईकर, उपअधीक्षक वाहतूक विभाग आशिष शिरोडकर, उपअधीक्षक जीआरपी- ऍडवीन कुलासो, उपअधीक्षक एसबी दक्षिण गोवा- शिवराम वायगंणकर, उपअधीक्षक किनारी विभाग संतोष देसाई, उपअधीक्षक मुख्यालय प्रविण कुमार वस्त, उपअधीक्षक उत्तर गोवा एसबी सलीम शेख, उपअधीक्षक एस अँड व्ही-एझिल्डा डिसोझा, उपअधीक्षक एसपीसीआर व वायरलेस राम आसरे, उपअधीक्षक आयआरबीएन सुदेश नार्वेकर.