42 मजली इमारतीचे मोठे नुकसान
वृत्तसंस्था/ चांग्शा
चीनच्या चांग्शा शहरातील एका गगनचुंबी इमारतीला शुक्रवारी भीषण आग लागली आहे. या दुर्घटनेतील बळींचा आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही. इमारतीतून मोठय़ा प्रमाणात धूर बाहेर पडत असून अनेक मजले पूर्ण जळून गेले आहेत. अग्निशमन दलाने आग विझविण्याचे आणि बचावाचे कार्य सुरू केले आहे.
या इमारतीत सरकारच्या मालकीची दूरसंचार कंपनी चाइना टेलिकॉमचे कार्यालय देखील होते. ही भीषण आग कशामुळे लागली हे देखील स्पष्ट नाही. दुर्घटनास्थळी अग्निशमन दलाची 36 वाहने पोहोचली असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येत होता.
तर संबंधित इमारतीची निर्मिती 2000 साली करण्यात आली होती. या इमारतीची उंची 218 मीटर असून यात एकूण 42 मजले आहेत. तर दोन मजले भूमिगत आहेत. याचमुळे ही आग वेगाने अनेक मजल्यांपर्यंत फैलावली.हुनान प्रांताची राजधानी असणाऱया चांग्शा शहराची लोकसंख्या सुमारे एक कोटी इतकी आहे.