दुमका / वृत्तसंस्था
झारखंडमधील दुमका येथे घडलेल्या आणखी भीषण घटनेत आरोपी शाहरुख याने एका अल्पवयीन हिंदू युवतीला जिवंत जाळून तिची हत्या केली आहे. हत्या करण्यापूर्वी याने तिच्यावर अनन्वित अत्याचार केल्याचेही उघड झाले आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. या अल्पवयीन युवतीची आरोपी शाहरुख नेहमी छेड काढत होता. शरीरसंबंध ठेवण्यासाठी त्याने तिच्यावर दबाव आणला होता. पण तिने त्याच्याशी बोलण्यास नकार दिल्याने त्याने तिच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून तिची निर्घृण हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतरही त्याने केलेल्या कृत्यासाठी कोणताही पश्चात्ताप व्यक्त केला नाही. या घटनेमुळे दुमका परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. अनेक हिंदू संघटनांनी निदर्शने करुन आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा करण्याची मागणी केली. झारखंड सरकारवर या प्रकरणाच्या प्रामाणिक चौकशीसाठी दबाव आणण्यात येईल, असे हिंदू संघटनांनी घोषित केले आहे.