12 वर्षापासून अंथरुणाला खिळलेला व्यक्ती आता हिंडतोय
अमेरिकेच्या एका कंपनीने 50 जणांच्या मेंदूत चिप बसविल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी आले होते. या चिपमुळे अंधत्व, बहिरेपणा, पॅरालिसिस, नैराश्य समवे अनेक आजारांवर उपचार करता येऊ शकतो असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. याचदरम्यान आणखी एक चमत्कार झाला आहे. नेदरलँडमध्ये एका 40 वर्षीय व्यक्ती दुर्घटनेमुळे 12 वर्षांपासून अंथरुणावर खिळून होता. परंतु आता तो हिंडू फिरू शकतोय. वैज्ञानिकांनी त्याच्या मेंदूत एक इलेक्ट्रॉनिक चिप बसविली असून यामुळे तो स्वत:च्या मेंदूला नियंत्रित करू शकतोय.
गर्ट-जान ओस्कम नावाचा हा व्यक्ती आता उभा राहून चालतोय तसेच जिने देखील चढू शकतोय. चीनमध्ये काम करत असताना ओस्कमसोबत दुर्घटना घडली होती. त्याच्या कण्याला ईजा झाली होती, यामुळे त्याला पाय देखील हलविता येत नव्हता. त्याला पॅरालिसिस झाले होते, कण्याच्या हाडाला झालेली ईजा मेंदू अन् कण्याच्या हाडामधील कम्युनिकेशन बाधित करत असल्याने त्याला पॅरालिसिस झाले होते. यानंतर न्यूरोसायंटिस्ट ग्रेगोइरे कोर्टाइन यांच्या संशोधनावर काम करण्यात आले.
वैज्ञानिकांच्या एका पथकाने हे कम्युनिकेशन पूर्ववत करण्यासाठी मेंदू आणि कण्याच्या हाडादरम्यान एक ‘वायरलेस डिजिटल ब्रिज’ विकसित करण्यावर काम केले. त्यांनी ओस्कमच्या मेंदूत एक इलेक्ट्रॉनिक यंत्र बसविले, हे यंत्र पायांच्या हालचालींवर नजर ठेवू लागले. जेव्हा आम्ही चालण्याविषयी विचार करतो, तेव्हा हे उपकरण मेंदूद्वारे निर्मित विद्युत संकेतांना डिकोड करते, मग मेंदूतून आलेल्या संकेतांना कण्याच्या हाडात इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनच्या माध्यमातून पाठविते. यामुळे स्नायू सक्रीय होतात आणि पाय पुन्हा संकेत प्राप्त करत हालचाली करू लागतात अशी माहिती संशोधन पथकाचे लेखक प्राध्यापक जॉक्लीने बलोच यांनी दिली आहे.
जखम बरी होऊ लागली
ही यंत्रणा वायरलेस पद्धतीने काम करत असल्याने रुग्ण स्वतंत्रपणे कुठेही हिंडू शकतो. गर्ट-जॉनच्या मेंदू अणि कण्याच्या हाडात इम्प्लांट लावण्यात आल्यावर सिस्टीमला कॅलिब्रेट करण्यासाठी काही मिनिटेच लागली. एक वर्षापेक्षा अत्रिुाक काळापासून गर्ट-जॉन आता याचा वापर करण्यास सक्षम आहे. सिस्टीमने गर्ट-जॉनला स्वबळावर उभे राहण्याची, चालण्याची आणि जिने चढण्याची शक्ती मिळवून दिली आहे. एवढेच नाही तर कण्याच्या हाडाला झालेली जखमही बरी होऊ लागली आहे.