महिला कुस्तीपटू पोलीस संरक्षणात ब्रिजभूषण सिंह यांच्या निवासस्थानी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात सुरू असलेल्या लैंगिक छळ प्रकरणाच्या तपासात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. जंतर-मंतरवर धरणे आंदोलनात सहभागी महिला कुस्तीपटू पोलिसांच्या संरक्षणात शुक्रवारी ब्रिजभूषण सिंह यांच्या निवासस्थानी पोहोचली. कुस्तीपटूंच्या या कुस्तीच्या लढतीत ब्रिजभूषण सिंग यांच्या घरापर्यंत अशाप्रकारे पोहोचल्याने अनेक प्रŽ उपस्थित होत आहेत. यासोबतच अल्पवयीन महिला कुस्तीपटूचे विधान बदलण्याचा काही संबंध आहे का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. अलीकडेच 17 वषीय अल्पवयीन कुस्तीपटूने ब्रिजभूषण सिंग यांच्यावरील लैंगिक शोषणाचे आरोप मागे घेतले आहेत. अल्पवयीन कुस्तीपटूच्या वडिलांनीही याला दुजोरा दिला आहे.
ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविऊद्ध लैंगिक छळ केल्याप्रकरणी दिल्ली पोलीस तपासासाठी त्यांच्या घरी पोहोचले आहेत. दिल्ली पोलिसांनी त्यांची यापूर्वी दोनदा चौकशी केली आहे. आतापर्यंत 200 हून अधिक लोकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. यामध्ये प्रशिक्षक, अधिकारी आणि कुस्तीपटूंचा समावेश आहे. दिल्ली पोलिसांच्या एसआयटीमध्ये दोन महिला पोलिसांचाही समावेश होता.
शुक्रवारी दिल्ली पोलिसांसोबत कुस्तीपटू महिलाही त्यांच्या घरी पोहोचल्याने अनेक तर्क-वितर्क व्यक्त केले जात आहेत. दिल्ली पोलिसांचे पथक सुमारे 30 मिनिटे ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या घरी होते. न्यायालयात स्टेटस रिपोर्ट दाखल करण्यापूर्वी काही गोष्टींची पडताळणी करणे आवश्यक असल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. एका कुस्तीपटूने 16 ऑक्टोबर 2017 रोजी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या दिल्लीतील निवासस्थानी गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. तसेच लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. ब्रिजभूषण यांना या आरोपाबाबत विचारले असता त्यांनी इन्कार केला होता.
पोलिसांकडून ‘एटीआर’ , 7 जुलै रोजी सुनावणी
कुस्तीपटूंनी 23 एप्रिल ते 28 मे पर्यंत नवी दिल्ली मधील जंतरमंतर याठिकाणी आंदोलन केले. याचदरम्यान त्यांच्यावर प्रक्षोभक भाषण केल्याचा गुन्हा नोंदवण्याची मागणी करणारी याचिका दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. कुस्तीपटूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बृजभूषण सिंह यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा हा प्रकार ‘हेट स्पीच’ गुन्ह्याअंतर्गत येतो, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. सदर तक्रारीनुसार दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात कुस्तीपटूंच्या निषेधाच्या संदर्भात न्यायालयात एटीआर (अॅक्शन टेकन रिपोर्ट) दाखल केला आहे. तक्रारीत कुस्तीपटूंवर ‘द्वेषपूर्ण भाषण’ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, तक्रारकर्त्याने सादर केलेल्या व्हिडिओमध्ये कुस्तीपटू घोषणाबाजी करताना दिसत नाहीत आणि द्वेषयुक्त भाषणाचा कोणताही गुन्हा केलेला नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. न्यायालयाने या प्रकरणी सुनावणीसाठी 7 जुलैची तारीख निश्चित केली आहे.