प्रतिनिधी/ सातारा
युवा लावणीसम्राट शिवम इंगळे सातारकर याची वर्ल्ड रेकॉर्डसाठी नॉनस्टॉप 26 तास लावणी सादर करण्यासाठी निवड झाली होती. त्याने सादरीकरण करुन नव्या विश्व विक्रमाला गवसणी घातली आहे. हा लावणीचा नृत्याविष्कार अहमदनगरमधील गेवराई जवळील बालग्राममध्ये दि. 30 मार्च रोजी सकाळी 11 वाजून 40 मिनिटाने सुरु झाला होता, तो 31 मार्च रोजी 1 वाजून 40 मिनिटानेच थांबला अन् नवा विश्वविक्रम झाला. त्याची नोंद वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. यापूर्वी तामिळनाडू ट्रेडिशनल करकट्टम फोक डान्स येथे सलग 5 तास लावणी सादर करण्याचा विक्रम मी. ए. शहाजान यांच्या नावे होता.
लावणी ही लोककला मानली जाते. याच लोककलेची आवड शिवम विष्णू इंगळे याला जडली. तो लावणीतच आपले भविष्य समजतो. त्याने राज्यात विविध ठिकाणी लावणीचे सादरीकरण करुन प्रेषकांची मने जिंकली असून युवा लावणीसम्राट म्हणून ओळख निर्माण केली आहे. दरम्यान त्याची लावणी सादर करण्याची कला पाहून वर्ल्ड रेकॉर्ड या संस्थेने दखल घेतली. त्याला नवा वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी व महाराष्ट्राची लोककला देशात पोहचविण्यासाठी निवड केली होती. गेवराई जवळील बालग्राममध्ये हा कार्यक्रम 30 मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये शिवम याने तब्बल 26 तास लावणी सादर करून नव्या वर्ल्ड रेकॉर्ड ला गवसणी घातली आहे. या लावणीचे नाँनस्टाँप सादरीकरण वर्ल्ड रेकॉर्ड या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष टी. मदन कुमार यांच्या उपस्थितीत पार पडले.
शिवम इंगळे त्याबाबत म्हणाला, माझं मुळगाव खटाव तालुक्यातील औंध आहे. पण लहानपणापासून वडिलांच्या नोकरीमुळे साताऱयातच आम्ही राहिलो. एखादा पुरुष स्त्राr वेशभूषा करून लावणी सादर करतो, हे लोकांना ऐकायलाच अगदी वेगळे होते. पाहण्यासाठी तर खूपच विशेष. ही लोककला जपण्याचा ध्यास मनी घेतला होता. पण समाजाची नजर ही नेहमी मला तू एक पुरुष आहेस आणि लावणी सादर करतो. तुला काही वेगळे वाटत नाही का?, तुला कसे काय आवडते ही वेशभूषा करून लावणी सादर करायला? असे अनेक प्रश्न माझ्यासमोर उपस्थित राहायचे. मला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. माझा मित्र परिवार, नातेवाईक यांना उत्तर द्यावे लागायचे की ही लोककला आहे आणि एखादा पुरुष स्त्राr वेशभूषा धारण करून नृत्य सादर करतो यात वावगं काय आहे. आपण बालगंधर्व यांना देखील पाहिलं होते. जर खरा लावणीचा इतिहास बघायला गेले तर आधीच्या काळात पुरुष हे लावणी स्त्राr वेशभूषा करूनच लावणी सादर करायचे. मला माझ्या आयुष्यात लावणी शिकण्याकरिता कोणी गुरु मिळाला नव्हता. फक्त सुरेखा बाईंना पाहून त्यांची कला मी माझ्यात उतरवली होती. म्हणून मी त्यांनाच माझा गुरु मानतो.
मी लातूर येथील कृषी महाविद्यालय लातूर येथे कृषी पदविका करीत होतो, शिक्षण घेत होतो. कॉलेजमध्ये अनेक असे कार्यक्रम असायचे. एक दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कॉलेजमध्ये मोटिवेशनल स्पीकर म्हणून सहारा नातले परिवार यांचे संचालक संतोष गर्जे यांना आमंत्रित केले होते. त्यांनी त्यांच्या जीवनातील अनाथ मुलांचा संघर्ष तेथे वर्तविला होता. त्यांच्या भावना अनाथ मुलांची जीवन व्यक्त केले होते हे पाहून मला या मुलांसाठी काहीतरी करायचं आहे, माझ्याकडे जी कला आहे ही कला या मुलांना मला द्यायची आहे, ही भावना निर्माण झाली. मी गरजे यांना विनंती केली की, सर मी तुमच्या मुलांसाठी नृत्य प्रशिक्षण देईन आणि मी सहारा ना नातले बालग्राम परिवार गेवराई येथे काही काळांसाठी मुलांना नृत्य प्रशिक्षणाची सेवा देत राहिलो आणि यातूनच एक सामाजिक भान माझ्या लक्षात आले. समाजासाठी काहीतरी केले पाहिजे, हा उद्देश उराशी ठेवून समाजासाठी आपण काहीतरी करूया म्हणून समाजकार्यासाठी पण सुरुवात केली, असे त्याने सांगितले.
शिवम इंगळे त्याबाबत म्हणाला, मी लावणी सेवक आहे. लहानपणापासून लावणी ऐकत होतो. सर्वप्रथम मी लावणी पोटासाठी नाचते मी परवा कुणाची या गाण्यावर सादरीकरण केले. मला त्या लावणी करिता प्रथम क्रमांक मिळाला होता. पुरुष असून एखाद्या स्त्राr वेशभूषेमध्ये नृत्य सादर करणे हे माझ्यासाठी सर्वप्रथम खूप अवघड बाब होती. पण मी ते शक्य करून दाखवलं. कृषी महाविद्यालय लातूर येथे शिक्षण घेत असताना मला अनेक माझ्या शिक्षकांनी या नृत्य प्रकारासाठी मदत केली.