मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या सूचना
प्रतिनिधी/ सातारा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांच्या दरे (ता. महाबळेश्वर) दौऱयावर आहेत. त्यांनी महाबळेश्वर, पाचगणीसह सातारा जिह्यातील क वर्ग पर्यटन तसेच धार्मिक व यात्रा स्थळांच्या विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी जिल्हय़ातील पर्यटन वाढत आहे. पर्यटकांना जास्तीत जास्त सुविधा पुरवून पर्यटन आणखी वाढण्यासाठी आराखडा तयार करावा, अशा सूचना जिल्हाधिकाऱयांना केल्या.
दरे येथील निवासस्थानी जिल्हाधिकारी रुचेश जयंवशी यांनी सादरीकरणाद्वारे जिह्यातील पर्यटन व धार्मिक स्थळांच्या विकासकामांची माहिती दिली. याप्रसंगी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समिर शेख आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, जिह्यातील ज्या ठिकाणी पर्यटक मोठय़ा संख्येने येत आहेत त्या ठिकाणी पर्यटकांना आणखीन चांगल्या वाढीव सुविधा निर्माण कराव्या. तसेच महाबळेश्वर, पाचगणी व्यतिरीक्त क वर्ग पर्यटनस्थळांवर पर्यटकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे क वर्ग पयर्टनस्थळांना चांगल्या सुविधा देण्यात येईल. जिह्यात पर्यटन विकासाला मोठा वाव आहे त्यामुळे इतर ठिकाणीही पर्यटन वाढीसाठी आराखडा तयार करावा.
यात्रा-उत्सवांसाठी निधी उपलब्ध करणार
जिह्यात विविध यात्रा व उत्सव मोठय़ा प्रमाणात साजरे करण्यात येतात. या यात्रा व उत्साहांना राज्यभरातून मोठय़ा प्रमाणात भाविक येत असतात. यांच्या सुविधेसाठी ही निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
महाबळेश्वर, पाचगणीसह जिह्यातील 27 क वर्ग पर्यटन स्थळांबरोबर धार्मिक, यात्रा स्थळांचा या आराखडय़ामध्ये समावेश आहे. जिल्हा प्रशासनाने सादर केलेल्या पर्यटन विकास आराखडय़ाबाबत समाधान व्यक्त करुन श्री. शिंदे म्हणाले, या आराखडय़ामध्ये स्थानिकांना रोजगार व पर्यटकांसाठी उभारण्यात येणाऱया सुविधांसाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल. तसेच कोयना जलाशयाच्या ठिकाणी हाऊस बोट सारखी सुविधा निर्माण करण्याच्या सूचना करुन जिल्हा प्रशासनाकडून सादर करण्यात येणाऱया उपक्रमांना निधी तातडीने दिला जाईल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.
अजिंक्यतारा संवर्धनासाठी वास्तुविशारद नेमावा-मुख्यमंत्री
कास परीसरात फुलांचा हंगाम असल्यावरच पर्यटक मोठय़ा संख्येने येत असतात. परंतु हे पर्यटक कास परिसरात बारमाही येण्यासाठी सुविधा वाढविण्याबाबत जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांनी सूचविलेल्या उपाययोजनांना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सकारात्मकता दर्शवली तसेच सातारा येथील अजिंक्यतारा व महाबळेश्वर तालुक्यातील प्रतापगड किल्ला संवर्धनासाठी वास्तुविशारद नेमावा यासाठीही निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशीही ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिली.