टीम स्थापन करून खेळला जातो खेळ
जगात एकाहून एक असे अजब प्रकार घडत असतात. यातील एक अजब खेळ ब्रिटनमध्ये खेळला जातो. आम्ही ज्या किड्यांना घरातून पळवून लावतो, त्याच किड्यांना या खेळामध्ये खेळाडू स्वत:कडे बोलावत असतात. बराच काळ चालणाऱ्या या खेळाचे नियम जाणून घेतल्यावर तुम्हाला हसू आवरता येणार नाही.
ब्रिटनच्या अनेक हिस्स्यांमध्ये या खेळाच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि याला फालमाउथ वॉर्म चार्मिंग चॅम्पियनशिप या नावाने ओळखले जाते. या खेणत स्पर्धकांना एक छोटासा प्लॉट दिला जातो, यात गवत उगवलेले असते, स्पर्धकाला वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरून गवतात लपलेल्या किड्यांना स्वत:कडे आकर्षित करावे लागते. याकरता पाणी देणे, नृत्य करणे, ड्रम वाजविणे यासारख्या कृती केल्या जातात.
सर्वसाधारपणे किडे जमिनीवरील वायब्रेशन ऐकून किंवा पाण्याचा ओलावा जाणवल्यावर बाहेर येतात, स्पर्धक जमिनीवर थाप मारून, संगीत, तसेच चिकटणाऱ्या गोष्टी गवतात टाकून किड्यांना स्वत:कडे खेचण्याचा प्रयत्न करतात. स्पर्धेनंतर या किड्यांना पुन्हा सोडले जाते. 2009 मध्ये स्पर्धेच्या अंतर्गत सर्वाधिक 567 किडे बाहेर काढण्यास यश आले होते, याचा विक्रम 10 वर्षीय सोफी स्मिथच्या नावावर आहे.