जंगलात मृत आढळला अखेरचा सदस्य
हजारो वर्षांपूर्वी माणूस जंगलातच राहत होता. कालौघात अनेक समुदाय निर्माण होत गेले. काळ बदलला तसा माणूस आधुनिक होत गेला, मानवी वस्त्या निर्माण झाल्या आणि त्याच्या जगण्याच्या पद्धतीही बदलल्या. सद्यकाळात जंगलांमध्ये राहणाऱया आदिवासी समुदायाचे प्रमाण कमी होत चालले आहे. ब्राझीलमधील अमेझॉनच्या जंगलांमध्यके अनेक समुदाय एकेकाळी आढळून यायचे, परंतु आता यातील बहुतांश समुदाय विलुप्त होण्याच्या वाटेवर आहेत. अलिकडेच एक समुदाय विलुप्त झाला आहे, कारण त्याच्या अखेरच्या सदस्याचा मृत्यू झाला आहे.
अमेझॉनच्या वर्षावनात राहणारा एक आदिवासी समुदाय पूर्णपणे विलुप्त झाल आहे. या समुदायाचा कधीच बाहेरील जगाशी कुठल्याही प्रकारचे संपर्क नव्हता. या समुदायाच्या अखेरच्या सदस्याला ‘मॅन ऑफ द होल’ म्हटले जात होते. तो एकटाच 26 वर्षांपर्यंत तनारू बेटावर राहत होता. ब्राझीलच्या जंगलांची सुरक्षा करणाऱया फुनई नावाच्या एजेन्सीने त्याला हे नाव दिले होते. हा आदिवासी सदस्य जंगलात खड्डे खोदून त्यात प्राण्यांना अडकवत होता आणि मग शिकार करत होता.
1996 मध्ये पहिल्यांदा दर्शन
या व्यक्तीला सर्वप्रथम 1996 मध्ये पाहिले गेले होते. त्याच्याशी संपर्क साधण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले होते. 23 ऑगस्ट रोजी या व्यक्तीचा मृतदेह एका झोपडीत आढळून आला आहे. समुदायाचे अन्य सदस्य 80 च्या दशकापर्यंत मृत्युमुखी पडले होते. गुरांचे पालन करणाऱया रँचर्सने जमिनीच्या आमिषापोटी मोठय़ा संख्येत या समुदायाच्या लोकांची हत्या केल्याचा दावा करण्यात येतो.
चकित करणारा दावा या व्यक्तीला स्वतःच्या मृत्यूबद्दल पूर्वकल्पना होता असा चकित करणारा दावा करण्यात येत आहे. या व्यक्तीच्या हातात मकाऊ पोपटाच्या पंखातील एक पिस होते. या समुदायात मरणपंथाला असताना हातात पोपटाचा पंख ठेवण्याची प्रथा होती. या समुदायाच्या लोकांना नावे नव्हती तसेच ते कुठलीही भाषा देखील बोलत नव्हते.