प्रतिनिधी /पेडणे
भाईडवाडा कोरगाव येथे अनिकेत भाटलेकर हरमल येथील नागरिक यांच्या मालकिची मालवाहू रिक्षाला (क्र. जीए-1öटी-3241) शॉर्टसर्किट होऊन आग लागली. यामध्ये रिक्षा जूळन खाक झाली. ही घटना रविवारी दि. 8 रोजी दु. 12.30 वा. घडली.
पेडणे अग्निशामक दलाला याची माहिती मिळताच पेडणे अग्निशामक दलाचे जवान डॉम्निक मार्टिन्स, श्याम आरोंदेकर, विकास चव्हाण, राजेश परब, प्रशांत सावळ देसाई यांनी घटनास्थळी जाऊन आग विझाविली. मात्र तोपर्यंत रिक्षा पूर्णपणे जळून खाक झाली होती. अनिकेत भाटलेकर यांनी हल्लीच नवीन मालवाहू रिक्षा घेतली होती.