8 महिन्यात लक्षणीय वाढ, ऑगस्टमध्ये 148 लाख प्रवाशांचा विमान प्रवास
नवी दिल्ली :
2023 च्या पहिल्या 8 महिन्यांमध्ये विमान प्रवाशांच्या संख्येमध्ये देशात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. उपलब्ध माहितीनुसार जानेवारी ते ऑगस्ट या दरम्यान देशांतर्गत विमान प्रवाशांची संख्या 1190.62 लाख इतकी झाली आहे.
मागच्या वर्षी ह्या अवधीच्या तुलनेत पाहता 38 टक्के वाढीव प्रवासी संख्या दिसून आली आहे. केवळ ऑगस्ट महिन्यामध्ये 23.13 टक्के इतकी प्रवाशांच्या संख्येमध्ये मासिक वृद्धी दिसून आली आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यात 148.27 लाख प्रवाशांनी विमान प्रवास केला आहे. दुसरीकडे ऑगस्ट महिन्यामध्ये 0.65 टक्के इतक्या प्रवाशांनी आपला प्रवास रद्द केल्याचेही दिसून आले आहे. 288 प्रवाशांनी विमान सेवेबाबत तक्रारी केल्याचीही माहिती आहे.
सुविधांबाबत समाधान
विमान प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली असून एकंदर विमान तळावरील व्यवस्था व सुविधा या बाबतीत समाधान दिसते आहे.