वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील दुसऱ्या सत्रात मंगळवारी चढउताराच्या प्रवासामध्ये बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक नुकसानीसोबत बंद झाले आहेत. या घसरणी मागे मागील काही संदर्भ पाहिल्यास यात पहिले म्हणजे चालू महिन्यात भारतीय रिझर्व्ह बँकेची होणारी पतधोरणा बैठक आणि तिमाहीमधील नफा कमाईचे सादर होणारे अहवाल याचा परिणाम हा आताच्या शेअर बाजारातील कामगिरीवर होत आहे. यामुळे बाजारात आता चढउताराचे ढग राहणार असल्याचे शेअर बाजार अभ्यासकांनी म्हटले आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 68.36 अंकांनी प्रभावीत होत 0.10 टक्क्यांसोबत निर्देशांक 66,459.31 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 20.25 अंकांनी घसरुन निर्देशांक 19,733.55 वर बंद झाला. यामध्ये प्रमुख कंपन्यांमध्ये आयडीबीआय बँक आठ टक्क्यांनी वधारली, तर पॉवर ग्रिड कॉर्पचे समभाग पाच टक्क्यांनी नुकसानीत राहिल्याची नोंद करण्यात आली.
सेन्स्सेक्समध्ये पॉवरग्रिडचे समभाग हे सर्वाधिक 5.11 टक्क्यांनी घसरुन बंद झाले आहेत. यासोबतच बजाज फिनसर्व्ह 1.60 टक्के नुकसानीत तर इंडसइंड बँक, स्टेट बँक, मारुती सुझुकी, रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभाग हे 1 टक्क्यांनी प्रभावीत होत बंद झाले. यासह एशियन पेन्ट्स, बजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट, कोटक महिंद्रा बँक, लार्सन अॅण्ड टुब्रो आणि हिंदुस्थान युनिलिव्हरचे समभाग हे लाल निशाण्यासह बंद झाले आहेत.
हे…..समभाग मात्र चमकले
दुसऱ्या बाजूला मात्र सेन्सेक्समध्ये एनटीपीसीचे समभाग हे 2.77 टक्क्यांनी मजबूत राहिले होते. यासह टेक महिंद्रा, एचसीएल टेक, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, अॅक्सिस बॅँक, टीसीएस, इन्फोसिस, जेएसडब्लू स्टील, विप्रो, सनफार्मा आणि नेस्ले इंडिया यांचे समभाग वधारुन बंद झाले.
मुख्य क्षेत्रांमध्ये मंगळवारी रियलटी निर्देशांक दोन टक्क्यांनी प्रभावीत होत बंद झाला आहे. पीएसयू बँकेचे निर्देशांक 0.5 टक्क्यांनी घसरले आहेत. यासह आयटीचे निर्देशांक 1 टक्कयांनी वधारला आहे. यासह धातूचे निर्देशांक 0.8 टक्क्यांनी तेजीत राहिले. बीएसई मिडकॅप 0.2 टक्क्यांनी नुकसानीत तर स्मॉलकॅपचा निर्देशांक 0.5 टक्क्यांनी वधारला आहे.