बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याने प्रेरित बेळगाव खडे बाजार येथील सुप्रसिद्ध टेलर सचिन काकडे यांनी ६० फूट उंच कोट तसेच २ इंचाचा लहान कोट मोदींच्या साठी भेट म्हणून तयार केला आहे .
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुरुवार दिनांक १२ जानेवारी रोजी हुबळी येथे आयोजित युवा जनोत्सवाला संबोधित करणार असून त्यांचा रोड शो आयोजित करण्यात आले आहे. यावेळी मोदींसाठी भेट म्हणून खास शिवण्यात आलेल्या कोट देण्यात येणार आहे . या कोट साठी बेळगावच्या सचिन काकडे टेलर्स यांनी परिश्रम घेतले आहेत. हा कोट ६० फूट उंच असून सर्वांचे लक्ष दूरवरून खेचत आहे . तसेच २ इंचाचा छोटा कोटही भेट म्हणून मोदींना देण्यात येणार आहे .