बेळगाव : वीजखांबाला ठोकरून भरधाव कार पलटी झाली. उचगाव-कोवाड रोडवरील बेकिनकेरेजवळ रविवारी सायंकाळी ही घटना घडली असून सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. उचगावहून कोवाडकडे जाणाऱ्या कारला हा अपघात झाला आहे. कारच्या ठोकरीने वीजखांबही वाकला आहे. या कारमध्ये एक दाम्पत्य प्रवास करीत होते. ते किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. चालकाचे नियंत्रण सुटून ही घटना घडल्याचे सांगण्यात आले.
Previous Articleराजरत्न आंबेडकर यांची बेळगावला भेट
Next Article धरणांनी गाठला तळ, कुचकामी ठरतोय नळ!
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.