गायीची हत्या,वासराची चोरी : दोन्ही संशयित परप्रांतीय
म्हापसा : शेळ-सडये, शिवोली येथे भाडेकऊ म्हणून राहणाऱ्या दोघा प्ररप्रांतियांनी घरमालकाच्या दुभत्या गायीची कोयत्याने हत्या कऊन वासऊ पळवून नेण्याची घटना बुधवार दि. 8 रोजी घडली. हे प्रकरण शनिवारी रात्री उघडकीस येऊन शिवोलीत वातावरण तंग बनले. शिवोली येथील स्वामी समर्थमठाचे पदाधिकारी नीलेश वेर्णेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी संशयित आरोपींना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. गोमात्येची हत्या केल्याची माहिती मिळताच शिवोलीवासियांनी घटनास्थळी धाव घेतली. संशयित आरोपींना चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. संशयित आरोपी मनबटल एक्का (वय 21) व आतानास लकडा (वय 23, दोघेही मूळ छत्तीसगड) राजेंद्र उर्फ राजेश मोरजकर यांच्याकडे भाडेकऊ म्हणून राहात होते. मोरजकर यांना घराशेजारी जागा नसल्याने शेळ सडये येथे आजोबा देवस्थानच्या सभागृहामागील शेतात गायींना बांधत असत. बुधवारी रात्रीपासून त्यांची दुभती गाय व वासऊ गायब होते.
नीलेश वेर्णेकर व सहकाऱ्यांची तत्परता
संययित आरोपी लकडा व एक्का शनिवारी रात्री 11.30 वा.च्या दरम्यान गायीचे मांस गोणपाटात भऊन नेत असल्याचे रस्त्याच्या शेजारील रिसॉर्टमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करणारे स्थानिक धना दाभोळकर यांनी पाहिले. संशय आल्याने दाभोळकर यांनी नीलेश वेर्णेकर यांना माहिती दिली व बोलावून घेतले. वेर्णेकर यांनी लगेच साथीदारांसह येत दोघांही संशयितांवर प्रश्नांची सरबत्ती केली. संशयितांनी काही वेळानंतर शेतात गायीची हत्या कऊन मांस नेत असल्याची कबुली दिली. ही माहिती वाऱ्यासारखी शिवोलीत पसरताच लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन संशयितांना चोप दिला.
संशयितांना घेतले ताब्यात
घटनेची माहिती हणजूण पोलिसांना देताच निरीक्षक प्रशल देसाई यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. दोघाही संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर पशू हत्या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल कऊन त्यांची रवानगी म्हापसा पोलीस स्थानकाच्या कोठडीत केली. पत्रकारांना माहिती देताना नीलेश वेर्णेकर यांनी सांगितले की, बुधवार दि. 8 रात्री रात्री 12 वा.नंतर ही गो-हत्येची घटना घडली. येथील सीसीटिव्ही पॅमेऱ्यामध्ये संशयित गोणपाटात काहीतरी घेऊन चालल्याचे आढळून आले होते. संशयितांची चौकशी केली असता हे दोघे राजेश मोरजकर यांच्या घरात राहात असल्याचे समजले. संशयित राहात असलेल्या खोलीत दोरी, हत्यारे सापडली. तसेच शेतात गायीची हत्या केल्याच्या खुणा तसेच गायीचे शीर सापडले. मात्र वासऊ सापडले नाही. त्यांनी हे मांस आपल्या भावोजींना साळगाव व ओशेल येथे दिल्याची कबुली दिली आहे.
संशयितांची कसून चौकशी करा : मोरजकर
या दोघांही संशयितांची कसून चौकशी कऊन आपल्याला न्याय द्यावा, अशी मागणी राजेश मोरजकर यांनी केली. नीलेश वेर्णेकर, प्रेमानंद आरोंदेकर, यदूवीर सीमेपुऊषकर, अमित मोरजकर, कपिल शिवडे, एकनाथ पेडणेकर, राजेश मोरजकर यांनी संशयितांना पकडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पोलीस उपअधीक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.