एका पायलटचा मृत्यू ः दुसरा गंभीर
रीवा / वृत्तसंस्था
मध्य प्रदेशातील रीवा येथे प्रशिक्षणार्थी विमान कोसळण्याची दुर्घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. या अपघातात एका वैमानिकाचा मृत्यू झाला, तर दुसऱया प्रशिक्षणार्थी वैमानिकाची प्रकृती चिंताजनक आहे. गुरुवारी रात्री 11.30 ते 12 च्या दरम्यान हा अपघात झाला. विमान सुरुवातीला आंब्याच्या झाडावर आदळले आणि नंतर मंदिराच्या कळसाला धडकून खाली कोसळले. दाट धुक्यामुळे हा अपघात घडल्याची माहिती प्राथमिक तपासाअंती देण्यात आली. या अपघातात प्रशिक्षण देत असलेले कॅप्टन विमल कुमार यांचा जागीच मृत्यू झाला, तर राजस्थानचा प्रशिक्षणार्थी पायलट सोनू यादव गंभीर जखमी झाला आहे. प्रशिक्षणार्थी पायलट सोनू यादवच्या छातीला आणि डोक्मयाला दुखापत झाली आहे. मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
मध्यप्रदेशात रीवा जिह्यातील चोरहाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उमरी गावात विमान दुर्घटनेची घडना घडली आहे. रीवा हवाईपट्टी विमानतळ म्हणून विकसित केली जात आहे. येथे फाल्कन एव्हिएशन टेनिंग अकादमी प्रशिक्षणार्थींना पायलटना प्रशिक्षण दिले जाते. गुरुवारी रात्री पायलट कॅप्टन विमल कुमार (54) राजस्थानचा प्रशिक्षणार्थी सोनू यादव (22) याला प्रशिक्षण देत असताना, त्यांचे विमान उमरी गावात आंब्याच्या झाडावर आदळले आणि नंतर ते जवळच असलेल्या एका मंदिराच्या घुमटावर कोसळले.
दोघेही अडकले ढिगाऱयाखाली
विमान मंदिरावर आदळताच मोठा स्फोट झाला. स्फोटाने गावातील लोक खडबडून जागे झाले. लोक घाबरून बाहेर आले. यादरम्यान विमानाचे अवशेष सर्वत्र पसरलेले दिसले. गावातील लोक घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना विमानाचे भाग विखुरलेले दिसले. लोकांनी विमानाचा सीट बेल्ट कापून दोन्ही पायलटना बाहेर काढले. तसेच गावकऱयांनीच प्रथम विमानतळ अधिकाऱयांना अपघाताची माहिती दिली. तसेच अपघाताविषयी पोलिसांनाही कळविले. अपघातानंतर 15 ते 20 मिनिटांत पोलीसही घटनास्थळी पोहोचले. घटनेची माहिती मिळताच डीएसपी उदित मिश्रा, स्टेशन प्रभारी चौराहा अनिमेश पांडे, त्याच स्टेशन प्रभारी सुनील गुप्ता आणि गुढ पोलीस स्टेशनचे प्रभारी अरविंद सिंह राठोड घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत अकादमीच्या कर्मचाऱयांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते.