बेळगाव प्रतिनिधी – मानवी जीवनात नियमित व्यवहारात खाद्यपदार्थांमध्ये गाई किंवा म्हैस यांच्या दुधाची मागणी प्रामुख्याने सर्वाधिक प्रमाणात आहे. शेतकरी शेती उद्योगाला जोडधंदा म्हणून म्हैस व गाय पाळण्याचे काम करतात. या म्हैशींचे दूध नियमितपणे काढून बाजारात ते विक्री केली जाते. व आपली आर्थिक गरज पूर्ण केली जाते.बेळगाव शहरात दसऱ्या दिवशी म्हैस स्वच्छ धुवून शर्यत लावली जाते. हि परंपरा गेल्या कित्येक पिढ्यांपासून गवळी गल्लीत जोपासली जात आहे. ही शर्यत पाहण्यासाठी तालुक्यातून गवळी समाजाचे लोक एकत्र येतात. व हा आनंद उत्सव साजरा करतात. नियमितपणे ज्या ग्राहकांना दूध विक्री केली जाते अशा ग्राहकांच्या घरासमोर जाऊन म्हैस नमस्कार करते. ग्राहक आनंदाने या म्हैशीला भेटवस्तू देतात. गवळी समाजातील लोक आपल्या मनोरंजनाचे साधन म्हणून या शर्यतीचे आयोजन करतात. प्रत्येक वर्षी या शर्यतीमध्ये अनेक लोक सहभाग घेत असतात.
Trending
- साखळी ओढल्याने आठ महिन्यात मध्य रेल्वेच्या १०७५ रेल्वेंना फटका
- हातकणंगले तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रसाद जाधव ,स्वरद गिरीगोसावी, सिद्धेश जगदाळे प्रथम
- ६९ हजारांचा गुटखा जप्त : उमदी पोलिसांची कारवाई
- Breaking : रायगड जिल्ह्यात 106 कोटींचे मेफेड्रोन जप्त; बंद कंपनीआड चालले होते उत्पादन
- नेमळे ते तळवडे जोडणाऱ्या पुलाचे भूमिपूजन
- काजू पिक विम्याची भरपाई आम्हाला द्या ; कारणे नकोत
- महुआ मोईत्रा यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द! आचार समितीचा अहवाल स्वीकारल्यानंतर सरकारचा निर्णय
- सख्ख्या काकाच्या खूनात पुतण्या दोषी